युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जगभऱ्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता भारतात पण अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. त्यांच प्राश्वभुमिवर नागपूर जिल्हातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांन साठी काही निर्देश जारी करण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरसच्या वाढता प्रभाव बघता सर्वच जिल्हा प्रशासन सतर्क झाली असून स्थानिक पातळीवर काही निर्णय घेतले जात आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी देखील मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क संदर्भातल्या काढलेल्या पत्रामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक असेल असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हे विनंती स्वरूपात असल्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचे म्हणणे आहे.
सध्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. पुढचे काही दिवस हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनासाठी अख्खं मंत्रिमंडळ आणि महत्वाचे नेते नागपुरात आहेत. सोबतच अधिवेशन काळात नागरिकांची देखील गर्दी नागपुरात होत असते. सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं नागपूर प्रशासन देखील सतर्क झालं आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348