पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे:– दिनांक २३ / १२ / २०२२ रोजी अधिकारी व स्टाफ असे युनिट १ कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार शशिकांत दरेकर व अनिकेत बाबर यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, दिनांक १८/१२/२०२२ रोजी डेक्कन चौपटी येथे काही इसमांनी कोयते घेवुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करुन सदर भागात लुटमार केली आहे. त्या बाबतची व्हिडोओ क्लिप प्राप्त झाली त्याअनुशंगाने तपास करुन आरोपीबाबत माहिती घेतली असता सदर आरोपी हे कोथरुड परिसरातील असलेबाबत समजले त्यांचा शोध घेत असताना सदर आरोपी हे दशभुजा गणपती मंदीराजवळ पौड फाटा कोथरुड येथे येणार असले बाबत वरील अंमलदारांना माहिती मिळाल्याने युनिट १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर इसमांना ताब्यात घेवुन चौकशी करणेबाबत आदेश दिल्याने युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता, बातमीदाराने दिलेल्या बातमीप्रमाणे तसेच व्हिडोओ मधिल दोन इसम है सदर ठिकाणी आले असता.
सदर इसमांना स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतले व त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नावे १) आसीफ राशिद अन्सारी वय २० वर्ष रा. शिंदे आळी, मयुर कॉलनी, कोथरूड पुणे २) रवि लालबहादुर विश्वकर्मा वय २० वर्ष रा. फ्लॅट नं २०३, राहुल गार्डन, दुसरा मजला मयुर कॉलनी कोथरूड पुणे असे सांगितले त्यास युनिट १ कार्यालयात आणुन त्यांचेकडे विश्वासात घेवुन तपास करता दिनांक १८/१२/२०२२ रोजी डेक्कन चौपटी येथे गेलो असता तेथे साथीदारासह त्यांच्या हातातील कोयतेचा धाक दाखवुन एका इसमाचे खिशातून जबरीने पैसे काढुन घेवुन त्यांचे गाडीवर कोयता मारून गाडीचे नुकसान करुन परिसरात दहशत केल्याचे सांगितले.
सदर बाबत डेक्कन पोलीस ठाणेकडील अभिलेख पाहता डेक्कन पोलीस ठाणे येथे सदर घटने बाबत गु. रजि. नोंद. १७६ / २०२२ भादवि कलम १४३ १४४, १४७, १४८ ३९५, ४२७, ३२३, ५०४, आर्म अॅक्ट ४ (२५). २७.३५ मपोकाक ३७ (१) १३५. क्रि. अ. लॉ अॅ. क. ७ प्रमाणे अज्ञात ५ इसमां विरुद्ध गुन्हा दाखल असलेबाबत समजले. तसेच सदर गुन्हयात दोन्ही आरोपींनी त्यांचे इत्तर साथीदार यांचेसोबत केल्याचे तपासात निष्पन्न शाल्याने तसेच त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने वरील दोन्ही आरोपींना पुढील कारवाईकामी डेक्कन पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ना. पोलीस आयुक्त श्री रितेशकुमार मा. पोलीस सहआयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १, श्री गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय जाधव, पोलीस अंमलदार शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, दत्ता सोनवणे यांनी केली आहे.