पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
सिंहगडरोड पोलिस स्टेशन पुणे शहर
पूणे:- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशनच्या हादीत दिवास व रात्रीच्या घरफोडी, वाहन चोरी च्या अनुशंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार ८६०० देवा चव्हाण पोलीस अंमलदार १०५१० सागर शेडगे यांना याच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीत वृंदावन शिल्प सोसायटी सिध्दी चौक चायरी पुणे येथील घरफोडी करणारा इसम त्याची दुव्हीलर मोपेड गाडी नं. एमएच/१२/एसव्ही/२२२६ त्याने अंगात लाल रंगाचा टी शर्ट व अंगात निळसर रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे वय अंदाजे २२ ते २५ वर्षे हा साईनगर हिंगणे खुर्द पुणे येथे थांबलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने आम्ही सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आम्ही वरील नमुद स्टाफ सह वडगाव ब्रिज येथून खाजगी वाहनाने निघुन बातमीतील ठिकाणाजवळ आलो असता बातमीतील वर्णनाचा इसम हा त्याचे जवळ असलेल्या मोपेड गाडीवर बसलेला दिसला त्यास आमची येण्याची चाहुल न लागू देताच त्यास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शशीकांत उर्फ बिल्डर आनंत माने वय २७ वर्षे रा. सध्या कुंजीरवाडी म्हातोबाची चाळ आळंदी हडपसर पुणे/वेताळनगर झोपडपट्टी मोरया हौसिंग सोसायटी बिल्डींग नं.५ फ्लॅट नं. ६१० चिचंवडगाव पुणे मुळ रा.मु.पो. रावतली करोडीघाट ता. पोलादपुर जि.महाड असे असल्याचे सांगितले, तो काही न बोलता कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पाहुन उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यांचा आम्हांस संशय आल्याने त्याचेकडे अधिक तपास करता त्याने दोन दिवसापुर्वी एका ठिकाणी चोरी केली असुन ते ठिकाण तुम्हाला दाखवतो असे सांगुन त्याने महे येथील एका बिल्डींगमधील चोरी केल्याचे दाखविले असता त्या अधिक माहिती घेतली असता सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ५४१ / २०२२ भादवि कलम ४५४ ३८० अन्वये दाखल असल्याची माहिती मिळुन आल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडे पोलीस कस्टडी दरम्यान अधिक तपास केला असता त्याने १) सिंहगड रोड पो स्टे गुन्हा रजि. ५१४ / २०२२ भादवि कलम ४५४ ३८० मधील २) सिंहगडरोड पो स्टे गुन्हा रजि. ५४४ / २०२२ भादवि कलम ४५४ ४५७ ३८० मधील) ३) सिंहगडरोड पो स्टे गुन्हा रजि न. ५४५/२०२२ भादवि कलम ४५४ ४५७ ३८० असे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणुन एकुण २ लाख ५६ हजार ९० रुपये किंमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून पुढील तपास सपोनि निकम सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. रितेश कुमार सो, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर मा. संदिप कर्णिक साो, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. राजेंद्र डहाळे सो पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. सुहेल शर्मा सो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ -३ श्री सुनिल पवार सो. सहा पोलीस आयुक्त. सिंहगडरोड विभाग श्री शैलेश संखे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, देवा चव्हाण, सागर शेडगे अमित बोडरे, अमोल पाटील, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर विकास बांदल, विकास पांडुळे यांचे पथकाने केली.