मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त बुधवारी ता. 28 डिसेंबरला वणा नदीचे सहस्त्र लिंगाचे तीरावर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने पंचक्रोशीतील हजारो अनुयायी गाडगे बाबांच्या पावन स्मृतीचे दर्शन घेणार आहे.
हिंगणघाट वणा नदीच्या तीरावर भरणाऱ्या या यात्रा महोत्सवाचे हे 66 वे वर्ष आहे. मंगळवार (ता.20 ) पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात झाली. पुण्यतिथी निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन वणा नदीचे सहस्त्र लिंगाचे तीरावर 28 डिसेंबर पर्यंत करण्यात आलेले आहे. महोत्सवात दररोज गाडगेबाबांच्या समाधीस्थळावर बबनराव धोटे बोरगाव दातार हे हरिपाठ भजन व काकड आरती करीत आहे. त्यांना प्रभाकर भोयर, गोपाल भोयर व संच हे साथ देत आहे. वणा नदी परिसरात पतंजली योग समितीद्वारे 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. योगाचार्य वसंतराव पाल गुरुजी हे मार्गदर्शन करीत आहे.
बुधवार तारीख 21 ला मला नदी परिसरात वणा नदी संवर्धन समितीच्या सहकार्याने भव्य चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली. यात चला जाणूया नदीला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नदीचे महत्त्व कळावे हा प्रमुख उद्देश होता. 28 डिसेंबर हा यात्रा महोत्सवाचा समारोपीय दिवस आहे. या दिवशी हजारो अनुयायी श्री संत गाडगेबाबांच्या नाम समाधीचे दर्शन घेऊन नतमस्तक होतात. यानिमित्ताने दुपारी तीन वाजता मधुकरराव रघाटाटे महाराज यांचे संत गाडगे बाबा नाम समाधी स्थळावर गोपाल काल्याचे किर्तन होणार आहे तसेच पैलतीरावर दुपारी दोन वाजता इंजिनीअर उदयपाल महाराज वणीकर यांचा समाज प्रबोधनात्मक सप्त खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गाडगे बाबांच्या अनुयायांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. 28 डिसेंबरला यात्रेनिमित्त आनंद मेळा तसेच विविध खाद्यपदार्थांचे दुकाने थाटण्यात येणार आहे. पंचक्रोशीत ही यात्रा प्रसिद्ध आहे.
गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र घराघरात रुजवण्यासाठी मंडळाच्या वतीने अभियान राबविण्यात येत आहे. गुरुवारी ता. २९ मंडळाच्या वतीने वणा नदीपरिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत गाडगेबाबा कल्याणकारी मंडळ व यात्रा कमिटीचे अध्यक्ष पुंडलिकराव भेंडे, कार्याध्यक्ष रुपेश लाजुरकर, उपाध्यक्ष तुषार हवाईकर, सचिव मंगेश वणीकर, सहसचिव अशोक मोरे, कोषाध्यक्ष लक्ष्मण बालपांडे, जनार्धन बाचलकर, पुरुषोत्तम डफ,सचिन मोरे, गोपाल जोडांगडे, शंभर मोरे, कुणाल रघाटाटे तसेच मंडळाचे कार्यकर्त्यांनी केलेले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348