सरपंच सुषमा मडावी यांचे अध्यक्षते खाली विशेष सभा पार पडली.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जील्हातील गोवर्धा येथील ग्रामपंचायत क्षेत्रातील महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदाची निवड एकमताने व्हावी यासाठी ग्राम पंचायतच्या वतीने आवाहन करण्यात आले. पण अध्यक्ष पदासाठी श्री.राजु दामोधर बारई आणि श्री.जावेद लतीफ शेख यांचे नाव पुढे येऊन एकमत न झाल्याने लोकशाही पद्धतीने निवडणुक प्रक्रिया पार पडली.
याप्रसंगी सभागृहात उपस्थित 30 सदस्य यांनी गुप्त मतदान पद्धतीने आपल्या मतदानाचा वापर केला. मतमोजणी अंती राजु बारई यांना 18 तर जावेद शेख यांना 12 मते पडली.अखेर राजु बारई हे 6 मतांनी विजयी झाले.
निवडणुक अधिकारी म्हणुन ग्रामविकास अधिकारी प्रदीप भांडेकर आणि मुख्याध्यापक बोरकर सर यांनी कामकाज बघितले.नवनिर्वाचित महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री.राजु बारई यांचे सरपंच सुषमा मडावी यांनी पुष्पगुछ देऊन ग्रा.पं.चे वतीने स्वागत केले.

