प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतन भाई इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेनाच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी सौ. वर्षाताई देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याप्रसंगी सौ. वर्षाताई देशमुख यांनी सांगितले की संघटना वाढवण्यासाठी दिवसरात्र एक करणार आहे. तसेच सर्व समाजाला न्याय हक्क अधिकार मिळावा यासाठी काम करणार आहे.
आज महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात दलीत, आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या महिला मोठ्या प्रमाणात या अत्याचाराला बळी पडत आहे. पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना अशा अस भगिनींना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेनाच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी सौ. वर्षाताई देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सर्वांनी शुभेच्छा आणि अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348