पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
युनिट-१ गुन्हे पुणे शहर
पुणे:- दिनांक २६ जुलै २०२२ रोजी नवावाडा नानापेठ, पुणे येथे रहाणारा मुलगा नामे अक्षय बल्लाळ याचा रहाते वस्तीमध्येच किशोर शिंदे व महेश बुरा या दोघांनी दगडाने ठेवून खुन केला होता, त्याचा बदला घेण्यासाठी मयत अक्षय बल्लाळ याचा मावस भाऊ नामे कृष्ण गाजुल याने त्याचे साथीदारांचे मदतीने किशोर शिंदे याचा भाऊ शेखर शिंदे यास मंगळवार दिनांक २७ / १२ / २०२२ रोजी मंडई मधिल रामेश्वर चौकात गाठून त्याचेवर पिस्टलने गोळ्या झाडून कोयत्याने चार करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आरोपी बाळकृष्ण गाजुल व त्याचे साथीदार यांचे विरुध्द फरासखाना पो स्टे येथे गु र नं २५५/२०२२ भादवि कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट ४(२५) म पो का क ३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा पासून आरोपी फरार होते. आरोपीना तात्काळ ताब्यात घेणेबाबत वरिष्ठांचे आदेश झाले होते.
यातील पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार अमोल पवार व पोलीस अंमलदार अजय थोरात यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहीजे आरोपीत नामे बाळकृष्ण गाजुल हा आज दिनांक २९/१२ /२०२२ रोजी त्याचे मित्रास भेटण्यासाठी मार्केटयार्ड बस स्टॉप जवळ येणार आहे. अशी खात्रीशीर बातमीप्राप्त झाल्याने लागलीच युनिट-१ कडील अधिकारी व अंमलदार यांनी नमुद ठिकाणी जावून बाळकृष्ण विष्णु गाजुल वय २४ वर्ष रा ११३/११४, नवावाडा, नानापेठ, पुणे यास ताब्यात घेवून त्यास पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलीस स्टेकडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – १ श्री गजानन टोम्पे, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोउपनिरी सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार इंग्रान शेख, आय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे, निलेश साबळे, शुभम देसाई, महेश बामगुडे यांनी केली आहे..