पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- दिनांक २७/१२/२०१२ रोजी इसम नामे शेखर शिंदे, रा. नवावाडा नाना पेठ, पुणे हे सायंकाळी ०१/३५ वा सुमारास त्यांच्या दुचाकी वरून बुधवार पेठ येथुन श्रीनाथ टॉकीजच्या दिशेने जात असताना आरोपी नामे रुपेश जाधव, गणेश येमुल निरज कटकम, कृष्णा गाजुल, कृष्णा बिटलिंग, व एक अनोळखी इसम यांनी शेखर शिंदे यांच्या अंगावर कोयत्याने वार करून व पिस्टलने फायर करुन त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याने फरासखाना पोलीस स्टेशन येथे २५५/२०२२ भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह कलम १३५. भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपींचा फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व पोलीस अंमलदार राकेश क्षीरसागर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन आरोपी नामे १) ऋषीकेश राजेश बिटलिंग, वय २४ वर्षे, रा. ११३/११४ नवा वाडा, नाना पेठ, पुणे २) अमर कृष्णाहरी बोलावत्री, वय २३ वर्षे, रा. बालाजी संगम बिल्डींग, चौथा मजला, जिवेश्वरहॉल जवळ, ६३७ गंज पेठ, पुणे ३) निरज श्रीनिवास कटकम, वय २२ वर्षे, रा. ११३ / ११४ नवावाडा, नाना पेठ, पुणे ४ ) सिध्दार्थ सुनिल पांगारे, वय २३ वर्षे, रा. १६९४ शुक्रवार पेठ, पुणे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सदरचा गुन्हा अक्षय लक्ष्मण बल्लाळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे श्री. संदीप गिल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शब्बीर सय्यद, सहा. पोलीस निरीक्षक, संतोष शिंदे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेसी, गणेश दळवी, तुषार खडके, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, गोहन दळवी, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे सुमित खुट्टे पंकज देशमुख अजित शिंदे, शशिकांत ननावरे, किशोर शिंदे यांच्या पथकाने केली आहे.