फयाज शेख पुणे शहर प्रतिनिधी
पुणे :- याप्रकरणी इंम्तियाज अफजल हुसेन शेख (वय ३७, रा. सय्यदनगर, हडपसर – Sayyad Nagar Hadapsar) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद Wanwadi Police Station (गु. रजि. नं. ५४०/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अतिक इक्बाल शेख (वय ३७, रा. सय्यदनगर, हडपसर), सादीक शेख (वय २५), हुसेन मुस्तफा कादरी यांच्यावर खूनाचा प्रयत्न व आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महंमदवाडी येथील जिल्हा प्रमुख शिव अल्पसंख्याक सेनाचे जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी रात्री साडेसहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे ओळखीचे आहेत.
फिर्यादीचा भाऊ इम्रान व सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात २७ डिसेंबरला भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन अतिक व इतर दुचाकीवरुन सय्यदनगर येथील गल्ली नं़ २२ मधील कार्यालयात आले़ कार्यालयात कोणी नसताना त्यावर लाथांनी मारुन मुख्य रस्त्यावर येऊन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे बोलून पिस्तुलातून फायरिंग (Firing In Pune) करुन दहशत निर्माण केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदिप शिवले (Sandeep Shivle) तपास करीत आहेत

