युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- माजी गृहमंत्री अनिल देशमुख एक वर्षांपासुन आर्थड जेल येथे परमवीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटीच्या वसुलीच्या आरोपावर CBI कस्टडी मध्ये होते. काल अनिल देशमुख यांची सुटका होताच जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यलय गणेश पेठ नागपुर येथे एसटी बस स्टॅन्ड चौक येथे फटाक्यांच्या अतिशबाजीसह ढोल ताश्यांच्या तालावर मिठाई तिळाचे लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वरजी बाळबुदे, युवक अध्यक्ष आशिष पुंड, अविनाश गोतमारे, किशोर बेलसरे, कपिल वानखेडे, पुंडलिक राऊत, सुधाकर तिबोले, प्रवीण खडे, गजानन महाकालकर, कैलास वरेकर, जीवनालाल डोंगरे, विलास झोडापे, गुड्डू बोकडे, अनुप दखाले, मीना बांदेबूचे, मंदाताई झोडे, दुर्गा वाढाई, मोहन ठाकरे, आदी उपस्तिथ होते.

