✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई, 01 जानेवारी:- सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. हल्ली तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडिओ चर्चेत असतात. अनेकदा हे व्हिडिओ गमतीशीर असतात. एखादा गमतीशीर व्हिडिओ व्हायरल झाला की नेटकरी तो मोठ्या प्रमाणात शेअर करतात. सोशल मीडियावर अनेकदा ट्रेन आणि त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे विचित्र व्हिडिओ व्हायल होत असतात. अशाच एका व्हिडिओची सध्या चर्चा होत आहे.
एका युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत समोरून रुळावरून ट्रेन येत असल्याचं दिसत आहे. ट्रेन फार स्पीडमध्ये नव्हती. या ट्रॅकवरच एक जण ट्रेनसमोर उभा राहून ‘फ्लाइंग किस’ देताना दिसत आहे. सुरुवातीला या मुलाला पाहून या तरुणाने दारू प्यायली असल्याचं वाटत होतं. पण तो हे फक्त मज्जा म्हणून करत असेल, असंही असू शकतं.
फ्लाइंग किस करून तो तरुण रेल्वे रुळावरून खाली उतरला. पण पुढे त्याच्याबरोबर काय घडणार आहे, हे कदाचित त्याला माहीत नव्हतं. कारण फ्लाइंग किस देऊन तरुण रुळावरून खाली उतरला पण तेवढ्यात त्या ट्रेनचा लोको पायलट ट्रेनखाली उतरून धावत त्याच्या जवळ आला. इतकंच नाही तर त्याने त्या तरुणाला मारायला सुरुवात केली. त्याने इतक्या जोरात मारलं की तो फ्लाइंग किस देणारा तरुण खाली पडला. तो पाठमोरा असताना लोको पायलटने मारल्यामुळे आपल्याला कोण मारत आहे, याची कल्पनाही त्या तरुणाला आली नाही. दरम्यान, हे सर्व घडत असताना ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कोणीतरी कैद केली. त्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
सोशल मीडियावर पोस्ट होताच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. एक टीव्ही रिपोर्टरही या व्हिडिओत दिसतो आहे त्याच्या कॅमेरामनला हे दृश्य दाखवयाला सांगतो आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे आणि ही घटना कुठे घडली आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या व्हिडिओच्या लोकेशनबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करत असून नेटकरी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
लोको पायलटने जे केलं, ते अगदी बरोबर केलं’, ‘अशा मद्यपी लोकांना मारायलाच हवं, त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे’, ‘अशा लोकांमुळेच अपघात होतात’, ‘अशा लोकांमुळे ट्रेन थांबवावी लागली, त्याला मारलं ते योग्य केलं’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

