✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.03:- स्त्रि शिक्षनाचा पाया रचनाऱ्या आणि स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीत स्थान मिळवून देणाऱ्या क्रान्तिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात एन. एस. एस. विभागाचे वतीने करण्यात आले होते. शिक्षनात स्त्री वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून देखील स्त्रीयावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मात्र तेवढ्याच तिव्रतेने वाढत असून त्याचा विचार होणे क्रमप्राप्त आहे.जोपर्यंत अत्याचारी मनुष्याची मानसिकता चांगली होत नाही तो पर्यंत अशा घटना घडतच राहतील. अशा विकृत लोकांची मानसिकता बदलन्याचे कार्य हे शिक्षकाचे असून कोणत्याही पालकांना आपला मुलगा असा विकृत व्हावा असे वाटणार नाही असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एम. राजुरकर यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस. आर. विहीरकर, प्रा. विकास बेले उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. ए. सी. बाभले, सन्चालन डॉ. जि. बी. ठक यानी तर आभार डॉ. राजू निखाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातिल सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्न्थ्याची उपस्थिती होती.