नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नारोडी:- गावच्या उपसरपंच पदावर प्रसाद काळे तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अजित हुले, संतोष हुले, ज्योती हुले, वर्षा हुले, भूमिका हुले, अनुराधा जंबुकर, श्वेता भुते यांचा लांडेवाडी येथील जनता दरबारात यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नवनियुक्त गावकारभाऱ्यांशी चर्चा करून गावच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी २५१५ ग्रामीण विकास योजनेतून गावठाणामधील मुक्तादेवी मंदिराजवळ सभामंडपासाठी रु.१५ लक्ष निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच या कामासाठी अधिकचा निधी मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुढील काळात लवकरच शासकीय निधीच्या माध्यमातून गावातील अधिकाधिक विकासकामांना गती देण्यात येईल असे यावेळी सांगितले. तसेच निवडून आलेल्या सदस्यांनी जनहिताच्या कामांना प्राधान्य देत आपल्या वार्ड मधील लहान-मोठी कामे लक्ष घालून सोडवावीत अशा सूचना केल्या.
या सत्कार समारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे मा. गटनेते देविदास दरेकर, नारोडी शाखाप्रमुख संदीप पिंगळे, मा.उपसरपंच स्वप्निल पिंगळे, सुनील पिंगळे, अविनाश घोडेकर, सोपान हुले, संतोष हुले, तेजस भुते, सोमनाथ हुले, देविदास हुले आदी मान्यवर उपस्थित होते.