नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील फोर्ट परिसरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक येथील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
मराठी माणसामध्ये अस्मितेचा अंगार फुलवणारे तसेच हिंदुत्वाचा हुंकार चेतवणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिरसावंद्य मानून उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून त्यांचेच विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत अशी भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.