जयहनुमान युवा क्रिडा मंडळाकडून कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील वासामुंडी येथे जयहनुमान युवा क्रीडा मंडळाकडून आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे उदघाटन नुकताच आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.
या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून येथील प्रतिष्ठित नागरिक माधव मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, गुरुपल्ली ग्रा.प.सदस्य अजय मडावी, माजी प.स. सदस्य रमेश तोरे, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जुलेख शेख, पोलीस पाटील गजानन मडावी, भूमिया दुलसा लेकामी, भूमिया चैतु मडावी, नगरसेविका जानोबाई मडावी, माजी नगरसेवक राहुल गावडे, गावडे सर, महारू मडावी, बंड मॅडम, तेलकुंटलावार सर, गुरुदास आत्राम, केशवजी मडावी, लालसुजी गावडे,राकेशजी मिनिवार, नारायण कोरेत, रामाजी मडावी, मालू मडावी,विश्वनाथ मडावी, दिवाकर गावडे, दिलीप गावडे सह आविसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्याकडून तर दोन्ही सामन्यासाठी द्वितीय पुरस्कार माजी जि.प.सदस्य संजय चरडूके,आविस तालुका उपाध्यक्षश्रीकांत चिप्पावार, आविस सचिव प्रज्वल नागुलवार यांच्याकडून तर तृतीय पुरस्कार प्रकाश मडावी व नगरसेविका जानोबाई गावडे यांच्यातर्फे ठेवण्यात आले.यासह या दोन्ही सामन्यासाठी मान्यवरांकडून अनेक आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले.
वासामुंडी जयहनुमान क्रीडा युवा मंडळाकडून आयोजित कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे यशस्वी आयोजनासाठी रतन गावडे, दिनेश गावडे, राकेश आत्राम, राहुल गावडे, विनायक पुंगाटी, पंकज मडावी, रमेश कांदो, आशिष वड्डे, संपत मुहुंदा, तेजीराव गावडे यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी पं.स.सदस्य रमेश तोरे यांनी मानले. या उदघाटनीय सोहळ्याला वासामुंडी सह परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होते.