विश्वास त्रिभुवन, अहमदनर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- घरकाम करणाऱ्या मोलकरीन संघटनेचा भव्य मेळावा राहाता येथे संत सेना महाराज मंदीरात असंख्य घरकाम करणाऱ्या मोलकरीन यांच्या उपस्थित नुकताच पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश महीला कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सौ. लताताई डांगे या होत्या.
यावेळी आपल्या भाषनात ऑल इंडिया मोलकरीन संघटनेच्या जनरल सेक्रेटरी यांनी देशातील मोलकरणींनसाठी करत असलेल्या कामाची सविस्तर माहीती दिली. कोरोना काळात घर मोलकरीन यांना काम करत असताना प्रचंड त्रास झाला त्यांना अनेक घरात काम करावे लागत असल्यामुळे त्यांचे कामच बंद झाले होते तेव्हा मोलकरीन संघटनेने संपूर्ण राज्यात लढा उभारून मोल करनींना दहा हजार रुपये प्रत्येकी मदत मिळऊन दिली या पुढील काळात देखील मोलकरीन करत असलेल्या कामाची शासनाने दखल घ्यावी. वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना पेंशन सुरु करावी असे अनेक प्रश्न आहेत याचा पाठपुरावा संघटना करीत आहे. वेळ पडलीच तर संपूर्ण महाराष्ट्रात मोलकरी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी संघर्ष करेल राज्यभर आंदोलन उभे केले जाईल असे कॉम्रेड बबली रावत यांनी आपल्या भाषनात सांगीतले.
अध्यक्षीय भाषनात लताताई डांगे यांनी मोलकरीन करीत असलेले कामाचे कौतुक केले. तुमच्या साठी माझ्या परीने मला जे करता येण्या सारखे आहे ते तुम्ही मला हक्काने सांगा माझ्या पातळीवर मि सर्वोतपरी मदत करील असे आपल्या भाषनात सांगीतले.
यावेळी युनायटेड कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सेक्रेटरी प्रा. कॉ. एल एम डांगे यांनी सदर मेळाव्यास उपस्थीत राहून शुभेच्छा दिल्या. या वेळेस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) संघटनेच्या राज्य कार्य कारनीवर निवड झालेल्या पदाधीकारी यांचा कॉ. बबली रावत व सौ. लताताई डांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळेस राज्यकारनी सदस्य कॉ. जयश्री नितीन गुरव कॉ उषा अडांगळे कॉ. सविता धापटकर यांनी आयटक संघटनेमुळे आम्ही करत असलेल्या आशा वर्कर कामात कसा आम्हाला फायदा मिळाला याचे अनुभव सांगीतले. या वेळी ग्राम पंचायत कर्मचारी कॉ. मारुती सावंत बिडी कामगार फेडरेशनचे कॉ निवृत्ती दातीर लाल बावटा कामगार युनियनचे सतिष पवार बिडी फेडरेशनच्या उपाध्यक्ष कॉ भारती न्यालपेल्ली यांचा कॉ. बबली रावत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक व आरोग्य संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजु देसल यांनी आशा व गट प्रवर्तक यांच्या मानधन वाढीसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर झालेला मिटींग ची सविस्तर माहीती दिली लवकरच आशांना गोड बातमी समजेल असे त्यांनी सांगीतले. आयटक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी व राष्ट्रीय कौंसील सदस्यपदी कॉ. अँड. सुधिर टोकेकर यांची नियुक्ती झाल्या बद्दल कॉ. बबली रावत व कॉ. राजु देसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
घरकाम करणाऱ्या मोलकरीन संघटनेच्या चांदवड च्या नेत्या लीलावती सस्कर यांनी मोलकरीन संघटना राहत्यात बंद होती तिचे मिटींग घेऊन कॉ. राजु देसले यांच्याशी संपर्क करून परत चांगल्या प्रकारे सुरु केली त्या बददल त्यांचा सत्कार कॉ. बबली रावत यांच्या हस्ते करण्यात आला.
मोलकरीन संघटनेच्या राज्य अध्यक्ष कॉ. सुशिला यादव या प्रकृती अस्वास्थामुळे कार्यक्रमास उपस्थीत राहु शकल्या नाही परंतु त्यांनी व्हीडिओ कॉन्फेरेंसीग द्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आशा गट प्रवर्तक संघटनेचे जील्हा संघटक व नुकतीच आयटक संघटनेच्या कोल्हापुर मध्ये झालेल्या राज्य अधिवेशनात राज्य कार्यकारनी सदस्य म्हणून नियुत्क केलेले कॉ. सुरेश पानसरे यांनी केले. होते तर त्यांना मोलाचे सहकार्य विनायक तुपे कॉ. उज्वला तुपे मिनाक्षी तुपे श्रीमती नंदा भारस्कर श्रीमती मिराबाई तुपे कॉ. सुनिता तुपे आशा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष कॉ. सविता धापटकर जील्हा कौंसील सदस्या कॉ. अश्विनी गोसावी यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामगार नेते कॉ. बाबा शेख यांनी केले तर आभार अँड. कॉ. सुधिर टोकेकर यांनी मानले.

