नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सोलापूर:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे लग्न करणाऱ्या युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी घेऊन फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार बार्शीत उघडकीस आला. याप्रकरणी कथित वधू-वर मंडळ, चालक महिलांसह एजंटास बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बार्शी तालुक्यातील बायपास रोडवर एका मंगल कार्यालयात सुशिक्षित मराठा महिला वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी तालुक्यातून हजारो महिला, पुरुष, पालक आणि लग्नाळू मुले आली होते. या सर्व पालक आणि मुलांना तुम्हाला आज या ठिकाणी मुलगी दाखवली जाईल,तसेच मुलगी पसंत पडताच लगेच लग्न लावून दिले जाईल,असं सांगितले होते. यातील कित्येक पालकांचा हा तिसरा मेळावा होता. प्रत्यक्षात त्यांना नवरी काही पाहावयास मिळाली नव्हती. मार्चपर्यंत आपणास नक्की मुलगी मिळेल, असे सांगितले जात होते.
मेळाव्यात सर्वांसमोर मुलांची नावे पुकारून बोलवले जात होते.बऱ्याच पालकांच्या आपली काहीतरी फसवणूक होत आहे,असे लक्षात आल्याने त्यानी नागरिकांना फोन करून सांगितले. जागरुक नागरिक येताच काहीतरी गडबड आहे,या ठिकाणी लोकांच्या भावनेशी खेळून खोटी आश्वासन दाखवून फसवणूक होत असल्याची बाब लक्षात येताच ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. एका कथित महिला वधू-वर सुचक मंडळाने आयोजित केलेल्या वधू- वर मेळाव्या साठी बार्शीसह भूम, परंडा, वाशी, करमाळा, कळंब आदी तालुक्यांतील शेकडो लग्नाळू आले होते.या युवक आणि पालकांकडून पैसे घेऊन फसगत झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या पालकांच्या आणि मुलांच्या व्हॉट्सअॅपवर काही बायोडाटा, मुलींचे फोटोदेखील पाठवले होते, मात्र २४ तासांत ते फोटो डिलीट केले जात होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे वधू-वर सुचक मंडळ हे नोंदणीकृत नाही,तसेच या मंडळाने आजपर्यंत एकही लग्न लावून दिलेले नाही. केवळ आश्वासने दिलेली असल्याचे यावेळी पोलिसांच्या वधू-वर -मंडळ चालक असलेल्या महिलेच्या बोलण्यावरून दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सदरची महिला आणि त्यांचे दहा-बारा एजेंट यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेले. पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.

