✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दि. 28 रोजी समुद्रपुर पोलीस स्टेशन येथील डि.बी. पथकातील पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो.शि.वैभव चरडे खाजगी वाहनाने पो.स्टे. परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांनी नागपुर ते हिंगणघाट महामार्ग जाम चौरस्ता येथे संशयावरून मोटर सायकल वरील दोन ईसमांना थांबवुन त्यांचे जवळील पिशवीची झडती घेतली असता, त्यात एका पिवळ्या कथिया रंगाची ज्यावर इंग्रजीत दोन्ही बाजुस गुरू गोविंदसिंग बिग बाजार प्रिंट असलेल्या कापडी पिशवीमध्ये हिरवट रंगाचा कळीदार ओलसर गांजा मिळुन आल्याने मोक्कावरच रितसर जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपी नामे अंकुश अरूण मेश्राम, वय 30 वर्ष, रा. महात्मा फुले वार्ड हिंगणघाट याचे ताब्यातुन 2,005 ग्रॅम गांजा किं 40,000 रू. व अंगझडतीतुन एक विवो कंपनीचा स्मार्ट फोन किं. 30,000 रू. चा माल व आरोपी नामे संदिप उर्फ आऊ सिध्दार्थ जनबंधु, वय 36 वर्ष, रा. महात्मा फुले वार्ड हिंगणधाट याचे ताब्यातुन गांजा वाहतुकी करीता वापरण्यात आलेली एक बजाज प्लॅटिना सिल्व्हर काळया रंगाची मोटर सायकल क्र. एम एच 26 यु. 4151 कि. 40,000 रू. व एक सॅमसंग कंपनीचा साधा मोबाईल किं. 1,000 रू. असा दोन्ही आरोपीचे ताब्यातुन जु.किं. 1,11,000 रू. चा माल जप्त करून, पो.स्टे. परतीनंतर दोन्ही आरोपीविरूध्द नमुद कलमान्वये सदरचा गुन्हा नोंद करून, दोन्ही आरोपीतांना रितसर अटक करण्यात आली असुन, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.उपनि.राम खोत करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे पो. उप.नि. पंकज मसराम, राम खोत पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, अक्षय राऊत (सायबर सेल वर्धा) पो.शि. वैभव चरडे, पो.शि. आलोक हनवते,नितिन ताराचंदी यांनी केली.

