नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- महाराष्ट्रात गुटखा तंबाखू विक्रीवर बंदी असताना बाहेरी राज्यातून रेल्वेच्या माध्यमातून गुटखा आणि तंबाखू आणून ते विक्री करण्यात येत आहे. अशाच एक प्रकरनाचा कल्याण रेल्वेच्या जी आर पी ने पर्दाफाश केला आहे.
मेल एक्सप्रेसच्या एसी बोगित सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा कल्याण जी आर पी ने पर्दाफाश केला आहे. कल्याण जी आर पी ने या बोगीत छापा टाकत गुटख्याचे भरलेल्या २४ गोण्या जप्त करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अली मुस्ताक मरहुम, कृष्णा गुप्ता, खेमराज प्रजापती अशी या आरोपींची नावे आहेत. यामधील कृष्णा गुप्ता हा हमाल आहे आणि उर्वरित दोन आरोपी हे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत.
आरोपींनी बिहार येथून मुंबईला हा गुटखा विक्री आणला होता त्यांनी आधी काही असे प्रकार केलेत का या तपास पोलीस करत आहेत.

