जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे धोरण असेल : सुर्या अडबाले
सौ. हनिषा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) पक्षाची ताकद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस बळकट व वाढीवर दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्षातर्फे आज नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे. युवासेना जिल्हाप्रमुखपदी सुर्या अडबाले यांना संधी देण्यात आलेली आहे.
बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, किरण साळी युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विदर्भाचे नेते किरण पांडव तसेच चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते, चंद्रपूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख बंडुभाऊ हजारे यांच्या मार्गदर्शनखालील हर्षल शिंदे युवासेना महाराष्ट्र कार्यकारी सदस्य यांच्या हस्ते युवासेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी सुर्या अडबाले यांची आज नागपूर शिवसेना विभागीय कार्यालय येथे नियुक्ती करण्यात आली. त्यांचे सामाजिक कार्य बघुन चंद्रपूर जिल्हा युवासेनेची जबाबदारी सुर्या अडबाले यांना देण्यात आली आहे.
सुर्या अडबाले यांची युवासेना चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबदल त्यांना चंद्रपूर जिल्हातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

