नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर दि.31 जाने:- मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये विनय नगर परिसरामध्ये असलेल्या मंदिराचा 9 वा वर्धापन दिन येत जवळ येत आहे. त्यामुळे येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी अनेक भाविक मंदिरात येतात. त्यामुळे हा परिसर साफ सफाई करून स्वच्छ दिसावा यामुळे मंदिराच्या कमेटी सदस्यांनी जैन सेलचे अध्यक्ष अजय शहा यांना याबाबत माहिती दिली.
जैन सेलचे अध्यक्ष अजय साह यांनी याबाबत परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दौलत गाजरे यांच्याशी बोलून हा संपूर्ण परिसराची साफसफाईचे करण्याबाबत चर्चा केली. नगरसेवक दौलत गाजरे यांनी तात्काळ मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाला संपर्क करून हा परिसराची साफ सफाई करण्याच्या सूचना केल्या. नगरसेवक दौलत गजरे यांनी दिलेल्या सूचनेच्या आधारावर आज संपूर्ण परिसची साफसफाईचे काम महानगर पालिका तर्फे करण्यात आले. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी पण हातभार लावला.
विनयनगर मध्ये झालेल्या साफ सफाई मुळे आज विनय नगरचे रूप बदलले आहे. आज विनय नगरचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. या कामात सहभागी झालेले परिसरातील प्रसिद्ध समाजसेवक पंकित भाई, दिलीप भाई, हितेश भाई सह बरेच लोक या कामात सहभागी झाले होते.
विनयनगर चा परिसर साफ सफाई करून स्वच्छ आणि सुंदर दिसावे म्हणून सतत धडपडणाऱ्या परिसरातील लोकप्रिय नगरसेवक दौलत गजरे यांचे परीसरातील नागरिकांनी आभार मानले. यावेळी नागरिकांनी महाराष्ट्र संदेश न्युजला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, या प्रभागातील नगरसेवक दौलत गजरे हे परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेहमी कार्य करत असतात. ते स्वता: उपस्थित राहून लोकांच्या प्रश्न सोडवतात. त्यामुळे आज या प्रभाग स्वच्छ आणि सुंदर दिसून येत आहे

