नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- गुन्हे शाखेला एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात यश आले आहे. तळोजा गावातील आदिक मन्सूर पटेल याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीबरोबर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध स्थापित केले. त्यात पीडित ही गरोदर राहिली दोन दिवसांपूर्वी तिची प्रसुती झाली, त्यात पुरुष जातीचे बालक जन्माला आले व लगेच त्याचा मृत्यू झाला. लग्नाचे आमिष आणि बलात्कार प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत २९ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा गंभीर असल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
त्यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा शोध घेत असतांना मंगळवारी अपरात्री एकच्या सुमारास आरोपी हा आस्का मजीदजवळ तळोजा गावात येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती बातमीदारमार्फत प्राप्त झाली. आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासासाठी खारघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

