✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मोबा.८६५७३४५९१६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगोली:- बेलवाडी तालुका हिंगोली या ठिकाणची घटना मयत बालाजी कांबळे यांचा मालकासोबत जिथे काम करत आहेत त्या मालकासोबत पैशाचा व्यवहार होता ते सालगडी म्हणून काम करत होते पैशाच्या व्यवहारातून त्यांनी त्यांच्या असणाऱ्या पैशाची मागणी केल्यास हिंगोलीला जाऊ तिथे हळद विकल्यानंतर तुझे पैसे देऊ असे सांगून त्यांना हिंगोलीला नेण्यात आले त्यानंतर तो मुलगा परत आलाच नाही 2 ऑगस्ट 2022 रोजी ही घटना घडली होती. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली गुन्हा घडला 2 ऑगस्ट 2022 आणि गुन्ह्याची नोंद करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाट पाहावी लागली परंतु आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. मयत मुलाचा मावस भाऊ याचे घर रात्री दीड वाजता जाळणे तसेच याचा दुसरा भाव याला रस्त्यात मारले व पारधी समाजाची महिला हिची छेडछाड केली असा खोटा गुन्हा नोंद करून करण्यात आला त्यानंतर नफ महाराष्ट्राचे पदाधिकारी यांनी पोलीस विभागाशी बोलले त्यानंतर पोलीस विभाग हे खोटं आहे छेडछाड केली हे खोटं आहे असे म्हणू लागले. परंतु प्रकरण खोट असताना गुन्ह्याची नोंद केली गेली ही महाराष्ट्रातील एक भयान घटना आहे हे सर्व होण्याचं कारण म्हणजे मावस भावांनी गुन्हा नोंद केला आहे तो मागे घ्यावा त्यासाठी हे सर्व त्रास देत आहेत.
मयत संतोष कांबळे याचा 25 हजार रुपयांचा व्यवहार मित्रांसोबत होता पैसे परत मागितले म्हणून त्याला पानगावला नेले हे सर्व गावाला माहित आहे तीन जण पानगाव येथे सोबत गेले सहा डिसेंबर रोजी ची ही घटना आहे जाताना तिघेजण सोबत गेले परंतु येताना फक्त दोघेच गावी परतले त्यानंतर आठ डिसेंबरला वर्तमानपत्राच्या माध्यमातून डेड बॉडी ची माहिती त्याच्या वडिलांना मिळाली या होण्याची अजूनही नोंद करण्यात आलेली नाही तसेच आरोपींना अटक झालेली नाही तर राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती च्या वतीने बेलवाडी व उदगीर येथील पीडिताना न्याय देण्यासाठी 6 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र भर तीव्र निषेध आंदोलने करण्यात येईलव पुढील काळात 3 टप्प्यात आंदोलन करणार असल्याची माहिती राज्य कार्यकारी अध्यक्ष ॲड हर्षवर्धन नाथभजन यांनी दिली.

