ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा, दि.५ फेब्रुवारी:- पत्रकार भवन जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटानचे जिल्हा अधिवेशन यशस्वीरित्या संपन्न झाले.
या अधिवेशनाचे उद्घाटन विशाल सोनवणे, नायब तहसीलदार जळगाव यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन शशिकांत हिंगोणेकर, विभागीय सचिव,माध्य.व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, लातुर हे होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक प्रा. डॉ. संघरक्षित भदरगे (राज्य प्रभारी, असंघटित क्षेत्र महाराष्ट्र राज्य) हे होते.
अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.संघरक्षित भदरगे यांनी आपल्या व्याख्यानात संघटित व असंघटित कामगारांना संविधानात केलेल्या तरतुदींचा मुद्देसूद मांडणी केली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ही बामसेफची सहयोगी संघटना आहे. ही ट्रेड युनियन आहे, ट्रेड युनियन ॲक्ट १९२६ च्या कामगार कायद्यान्वये या ट्रेड युनियची भारत सरकारची मान्यता आहे. जिच्या अंतर्गत ८४९ विविध संघटना समाविष्ट आहेत.

भारतात १६१५३ ट्रेड युनियन आहेत. २०१८ वर्षी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ही विकी पिडिया रिपोर्ट मध्ये १० व्या क्रमांकावर आहे.
धर्मादाय कामगार नोंदणी ॲक्ट १९६० नुसार भारतातील ब-याचशा संघटना नोंदणीकृत आहेत. या दान प्रकारच्या संघटना आहेत. त्यामुळे या संघटनांना आंदोलन, मोर्च काढण्याचे अधिकार नाहीत. त्यांना मेस्मा कायदा लागु आहे. या सर्व ट्रेड युनियनचे अध्यक्ष, महासचिव हे उच्चवर्णीय आहेत. प्रत्येक ट्रेडयुनियनमध्ये पॉलिटब्युरो आहेत. या पॉलिटब्युरोमध्ये सर्वजण हे उच्चवर्णीय असल्याने बहुसंख्येने असलेल्या कर्मचा-यांच्या भवितव्याचा निर्णय या लोकांच्या हातात आहे.त्यामुळे संविधान व कामगारविरोधी कायदे होत असताना कोणतेही आंदोलन होताना दिसत नाही.
बहुसंख्य कर्मचारी हे बहुजन समाजातील असल्याने त्यांचे संवैधानिक हक्क व अधिकार सुरक्षित रहावेत यासाठी या उच्चवर्णीय ट्रेड युनियन कोणताही प्रयत्न करत नसल्याने राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ही बहुजनांची ट्रेड युनियन २०१३ साली स्थापन करण्यात आली.
राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ…खाजगीकरणाच्या विरोधात लढत आहे. नवीन पेन्शन योजना, शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण व बाजारीकरण, सरकारी उद्योगांची भांडवलदारांना विक्री अशा विविध समस्यांवर विरोध करित आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशोर नरवाडे,(जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ) यांनी सुत्रसंचलन केले.
प्रास्ताविक बामसेफचे राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे यांनी प्रास्ताविक केले. आभार राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जळगाव जिल्हा सदस्य राहुल अहिरे यांनी आभार मानले.
या अधिवेशनासाठी जळगाव जिल्ह्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

