तुम पर कोड़ों की बरसात हुई,
तुम घोड़ों में बांधकर घसीटे गए,
फिर भी तुम्हें मारा नहीं जा सका,
तुम भागलपुर में सरेआम,
फांसी पर लटका दिए गए,
फिर भी डरते रहे ज़मींदार और अंग्रेज़,
तुम्हारी तिलका (गुस्सैल) आंखों से,
मर कर भी तुम मारे नहीं जा सके।
✒️प्रशांत जगताप मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- तिलका मांझी भारतीय स्वतंत्रता संग्रामातील पहले स्वतंत्रता सेनानी. बिहारच्या घनदाट जंगलात ब्रिटिश शासनाच्या समोर तिलका मांझी यांनी लढाई लढली. 1857 च्या क्रांतिच्या 80 वर्ष जुनी ये शहीद ये क्रांती ये बाब आहे. म्हणून, वास्तविकपणे तिलका मांझीला प्रथम स्वातंत्र्य सेनानी म्हणले जाते. पण भारतीय इतिहासकारांनी धर्म जाती वादाच्या पार्श्वभूमीवर मंगल पांडे यांचा उदव करून तिलका मांझीला इतिहासाच्या पानावरून गायब केलं. तर चला, या लेखात भारतमातेसाठी प्रथम शहीद होणाऱ्या तिलका मांझीचा जीवन परिचय विस्ताराने जाणून घेऊया.
शहीद ये क्रांती तिलका मांझीचा जन्म 11 फेब्रुवारी, 1750 ला बिहार राज्यातील सुल्तानगंजमध्ये ‘तिलकपूर’ नावाच्या गावामध्ये एका संथाल कुटंबात झाला. वडिलांचे नाव सुंदरा मुर्मू होते. तिलका मांझी यांचे वास्तविक नाव ‘जबरा पहाडिया’ हे होते. तिलका मांझी हे नाव त्यांना ब्रिटिश सरकारकडून देण्यात आले.
पहाडी भाषामध्ये ‘तिलका’ चा अर्थ आहे रागिष्ट आणि लाल लाल डोळ्याचा व्यक्ति. ते गावाचे प्रधान होते, म्हणून त्यांना मांझीही सांगितले. कारण की, पहाडी समुदायामध्ये गावातील प्रधानाला मांझी म्हणून बोलण्याची प्रथा आहे.
संघर्ष आणि योगदान | तिळका माझी योगदान
ते नेहमी बघत होते की ब्रिटिश शासनाचे अधिकारी आपल्या जंगलांच्या मूल्यवान वस्तूंना लुटत होते, त्यामुळे त्यांच्या क्षेत्राच्या आदिवासियांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तिलका ने या विरोधात आवाज बुलंद केला आणि अंग्रेजी शासनाच्या विरोधात लढाई सुरु केली. अंग्रेज सरकारच्या विरोधात लढाई लढ़ण्यासाठी लोकाना एकजुट करण्याचे कार्य तिलका मांझी यांनी केले आहे.
1771 ते 1784 पर्यंत ते ब्रिटिश सत्ताचा विरुद्ध लढाई लढले. तिलका मांझी यांनी 1778 ई. मध्ये पहाड़िया सरदार याच्याशी मिळून रामगढ़ कैंप वर कब्जा केला. इथून अंग्रेजाना दूर सारून कैंप ला मुक्त केलं. 1784 मध्ये मांझी यांनी क्लीवलँड यांची हत्या केली. त्याच्यानंतर ब्रिटिश अधिकारी आयरकुटच्या नेतृत्वात तिलका यांनी स्थापन केलेल्या गुरिल्ला सेना वर हमला करण्यात आला त्यात अनेक जवान शहीद झाले आणि तिलका मांझी यांना अटक केल्या गेल. असे म्हणतात की, त्यांना चार घोड्याला बांधुन जमिनीवरून फरफळत नेले होते. भागलपुर मध्ये तिलका यांच्या लाल डोळ्याला बघून अंग्रेज़ खूप घाबरले होते. ब्रिटिश अधिकारी यांनी भागलपुर येथील मुख्य चौकात स्थित एका विशाल वटवृक्ष वरती लटकवून त्यांची हत्या केली.
असे म्हणतात की, तिलका उर्फ जबरा पहाडिया यांना फांसी वर लटवण्याआधी पाहिले गीत म्हटल होत. हांसी-हांसी चढ़बो फांसी……! तिलका यांनी जिवंतपणी अंग्रेज़ अधिकाऱ्यांनी “आरामाची झोप नाही घेतली” अंग्रेज शासनाला भारतातून हाकलून लावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला पण, तिलका मांझी यांचे इतिहासात वर्णन इतिहास कारानी केलं नाही. भारतीय स्वतंत्राच्या लढाईतील पहिला शहीद तिलका मांझी यांना महाराष्ट्र संदेश न्युजचा मानाचा सलाम.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348