युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- कळमेश्वर तालुक्यातील जनमाणसांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकूण बातमीदारी बरोबर सामाजीक दायीत्व जपणार्या नागपुर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित कळमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना शासकिय विश्रामग्रुह येथे पदाधिकार्यांच्या उपस्थीतीत संपन्न झाली.
जुण्या कार्यकारणीचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने जिल्हाध्यक्ष प्रदिप घूमडवार, कार्याध्यक्ष सुभाष वराडे यांच्या आदेशानुसार जेष्ठ पञकार चंद्रशेखर श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली कळमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघ नव्याने कार्यान्वित करण्यात आली. यावेळी कळमेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार आशिष सौदागर यांची तर उपाध्यक्षपदी पत्रकार संजय गणोरकर व अरविंद ढोले तर कार्य अध्यक्ष पदी युवराज मेश्राम, कोषाध्यक्षपदी पत्रकार डाॅ.संदिप भुयार यांची तर सचिवपदी जयंत अढावू,कार्याध्यक्षपदी युवराज मेश्राम,सहसचिवपदी विजय नागपुरे,जिल्हा प्रतीनीधीपदी पुंडलीक धार्मीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार चंद्रशेखर श्रिखंडे यांची निवड करन्यात आली आहे. नविन कार्यकारनीची निवड जाहिर करुन कार्यकारनीने सदस्य संख्या वाढवून सामाजीक बांधिलकी म्हणून शहरासह ग्रामिण भागात विविध सामाजीक उपक्रम राबवून योग्य पद्धतीने वाटचाल करेल अशी ग्वाही नुतन पदाधिकार्यांनी दिली.