राजेंद्र झाडे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- धाबा येथील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा च्या वतीने भाजपा महिला आघाडी च्या वतीने श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान सभागृह धाबा येथे स्त्री शक्तिचा सन्मानार्थ आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा या गावी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. अश्या स्रीचा सन्मानार्थ महिला दिन साजरा करण्यात आला. यात प्रामूख्याने आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस , तसेच विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डाॅ. जोत्सना केशट्टीवार यांनी आरोग्यविषयक महिलांना मार्गदर्शन केले. ॲड. अरूणाताई जांभूळकर यांनी कायदेविषयक ज्ञान दिले एकाग्रता वाढवण्यासाठी तसेच चिंतामुक्त होण्यासाठी आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीस आवश्यक असलेली ध्यानबद्दल मार्गदर्शन सौ. ज्योती दिंडोकर, सौ. सारिका माडूरवार यांनी केले व प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच महिलांचा कला गूणांचा विस्तार करण्या साठी एकल नृत्य व सामूहिक नृत्य स्पर्धा घेण्यात आला.
विशेष म्हणजे सामूहिक खेळात सर्व महिला सहभाग घेऊन बालपणातील जीवणाला उजळणी दिली. या कार्क्रमाची सूरूवात राज्यगीत “जय जय महाराष्ट्र माझा” सौ. सुवर्णा बच्चूवार, सौ. सूषमा गरपल्लीवार यांनी गायीलेल्या गाण्यांनी झाली. जि.प.सदस्या सौ. वैष्णवीताई अमर बोडलावार यांनी प्रस्तावना सादर केले. सूत्रसंचालन सौ. स्नेहा शेरकी, सौ. कंचन गरपल्लीवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ रोशनीताई अनमूलवार सरपंच धाबा यांनी केली. सौ रेणूकाताई दूधे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर सौ सूरेखाताई श्रीकोंडावार भाजपा तालूका अध्यक्ष गोंडपिपरी यांनी आपले अध्यक्षस्थान व कोमलताई फरकडे सदस्य ग्रा पं लिखीतवाडा व जिल्हा सहसंयोजिका पंचायत राज व ग्राम विकास विभाग चंद्रपूर यांनी स्वीकारले, तर कार्यक्रमात नंदाताई घोगरे सरपंच ग्रा पं.धाबा, सौ कल्पनाताई अवथरे जि.प. सदस्य चंद्रपूर, सौ कुसुमताई ढूमणे मा पं स सदस्य गोंडपिपरी, नगरसेविका कु. मनिषा मडावी, सौ अश्विनी तोडासे, सौ मनिषा दुर्योधन, सौ सूशिला पूलगमकर सरपंच ग्राम पंचायत हिवरा, सौ किरण ईजमनकर सरपंच सोमनपल्ली, सौ लक्ष्मीताई बालूगवार सरपंच भंगाराम तळोधी, ग्राम पंचायत सदस्य निलीमा कंदीकूरवार, सौ. समता कोपावार, अनिसा शेख, सौ. सूरेखा येलमूले, सौ. वर्षा कूत्तरमारे, नम्रता बारसागडे, ग्राम पंचायत सदस्य सौ.पपीता कोडापे, सौ. कोमल मूग्गलवार,आदि मंचावर उपस्थित होते.
मा