आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती आणि पौर्णिमा निमित्त यशोधरा बुद्ध विहार महात्मा फुले वॉर्ड हिंगणघाट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दि. 5 मे ला सकाळ पासूनच बुद्ध पौर्णिमे निमित्याने यशोधरा बुद्ध विहार येथे महात्मा फुले वॉर्ड मधील महिला आणि पुरुषांनी गर्दी केली होती. यावेळी विविध उपक्रमांनी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती यशोधरा बुद्ध विहार महात्मा फुले वॉर्ड हिंगणघाट येथील महिला मंडळ तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून पूजन करण्यात आले. ‘बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संगम शरणं गच्छामी’ या पंचशिलाने परिसरात मंगलमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात खीर पुरी वाटप करण्यात आली. त्यांचा शेकडो नागरिकांनी आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी बापूराव जनबंधू, ॲड. रवी चौधरी, दीपक कापसे, समीर भोसले, राहुल सहारे, प्रमोद अंबादे, विशाल अंबादे, संजय अंबादे, प्रशांत इंदुरकर, माया कापसे, प्रतिभा अंबादे, यशोधरा साहारे, उज्वला भोसले, बाळसागडे ताई, वाडके ताई, माला कांबळे, शिला जनबंधू, बबिता अंबादे, अनुसया राऊत, शीतल साहारे, अंबादेताई, सुष्मा मून, शेंडेताई, पौर्णिमा रंगारी, गुड्डी नंदागवळी, अतुल रामटेके, भारत बोदीले, दादा रामटेके, गौरव नंदगवली, हर्षल बोदीले, आकाश वाळके सह अनेक महिला आणि पुरुषांनी सहकार्य केले.