आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- राज्यात वैज्ञानिक व तंत्रज्ञानिक शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या ही वाढावी, तसेच मुलींना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा इत्यादी शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रत्येक वर्षाला 50 हजार रुपये पर्यंतचे शिष्यवृत्ती देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थिनींना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्याकडून महाराष्ट्रातील पात्र सर्व मुलींना व इतर राज्यातील मुलींना सुद्धा गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
ए आय सी टी इ यांनी याबाबतची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली आहे. डिप्लोमा मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी म्हणजेच डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी थेट दहावीतून प्रथम वर्ष ॲडमिशन घेणाऱ्या किंवा 12 नंतर द्वितीय वर्षाला ऍडमिशन घेणार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणवत्ता वर आधारित राहणार किंवा ऍडमिशन वेळी पात्र गुणांवर आधारित राहणार. देशांमधील व राज्यांमधील जवळजवळ पाच हजार विद्यार्थींना यश शिष्यवृत्तीचा लाभ भेटणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थी पोर्टल वर जाऊन स्कॉलरशिप साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.