उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी यांच्या उपस्थितीत जत तालुका संघटनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी कार्यकारिणीची बैठक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय वाघमारे आणि जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या नेतृत्वाखालील व साहेबराव ओवाळे आणि सुबान देशमुख यांनी नियोजन केली. सेवक कामगार संघटनेचे कामगार हितात होत असलेले कामाबद्दल संपूर्ण माहीती शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली.
यावेळी अनेक इच्छुकांकडून मुलाखती घेऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सांगली जिल्हा संघटक पदी सुभान देशमुख आणि जत तालुकाध्यक्ष पदी विलास बाबर, उपाध्यक्ष पदी जालिंदर येडवे, सिंधूताई करांडे, महासचिव पदी साहेबराव उबाळे, सचिव पदी अतुल शिंदे, प्रसिद्धी प्रमुख पदी अभिशेक चौगुले, दिलीप शिंदे आदिंची निवड करण्यात आली.
यावेळी सर्वांनी निश्चय केला कि सेवक कामगार संघटनेकडून मिळालेल्या जबाबदारीवर जिद्दीने काम करत कामगार हितासाठी, कामगार रक्षणासाठी एक सक्षम पर्याय म्हणून सेवक कामगार संघटना उभी करून दाखवू ह्या नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उत्साहा बघुन प्रशांत कदम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. त्या वेळेस कवठेमहंकाळ तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे, तालुका महासचिव प्रथमेश बनसोड, अनिस मोमीन, शाहरूख तमदड्डे आदि उपस्थित होते.