मधुकर गोंगले, अहेरी
या आरोग्य शिबिरासाठी आसिसी सेवासदन हॉस्पिटल नागेपाल्ली येथील डॉ. लिली, सिस्टर मेरी फ्रान्सिस, सिस्टर मोनिका फ्रान्सिस यांनी तपासणी करून त्यांना औषधी वाटप करण्यात आली, उमेश खालको लेप्रसी टेक्निशियन THO अहेरी यांनी कृष्टरोग, क्षयरोगा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये महिला, किशोरवयीन मुलीनी चांगला सहभाग घेतला व त्यांना आरोग्य स्वच्छतेची माहिती देण्यात आली. गरोदर, स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी होण्याकरिता फादर थॉमसन संचालक यांचे मार्गदर्शन खाली मधूकर गोपले प्रकल्प समन्वयक यांनी नियोजन केले. तसेच प्रेमिल मरशेटीवार, वंदना आलोने अशा कार्यकर्ता, सलमान जुमडे कार्यकर्ता, रमेश असीसी सेवासदन व गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.
या आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. आपल्या आरोग्य तपासणी करून घेऊन हे शिबिर आयोजित करणाऱ्या संस्थेचे आभार मानले.