Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वर्ष भर शेतात राबणाऱ्या बैला प्रती कृतज्ञता राहूया, सर्व मिळून पोळा साजरा करूया.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 26, 2022
in Uncategorized, देश विदेश, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
वर्ष भर शेतात राबणाऱ्या बैला प्रती कृतज्ञता राहूया, सर्व मिळून पोळा साजरा करूया.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखक – प्रशांत जगताप, महाराष्ट्र संदेश न्युज

बैल पोळा:- शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळ्यात सजू दे.

शिंगे घासली, बाशिंगे लावली माढुळी बांधली, म्होरकी आवळली तोडे चढविले, कासारा ओढला घुंगुरमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैल पोळा.

बळीराजाच्या बरोबर वर्षभर शेतात राबून आपल्या अन्न धान्याचा पोशिंदा बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हर वर्षी बैल पोळा मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात साजरा केला जातो. महाराष्ट्रात पोळा या सणाचे एक विशेष महत्त्व आहे. श्रावणात पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात बैल पोळा साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी सर्जा राजाने वर्षभर नीष्ठेने केलेल्या कार्यासाठी बैलांप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानतो.

आज कितीही यांत्रकीकरण झाले तरी बैलाची जी किंमत आहे. ती काही कमी झालेली नाही आणि ती कधीच कमी होणार पण नाही. निसार्थ कष्टाचं उदाहरण देण्यात आल तर सर्वात अगोदर आपल्या शेतकऱ्याचा बैलाच नाव अगोदर येत. बैला शिवाय शेतीला किंमत नाही, शेतकऱ्या शिवाय माती उगवत नाही.

महाराष्ट्रासह देशातील विविध भागात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण हा साजरा केला जातो. मात्र प्रत्येक राज्यात परंपरा आणि मान्यता वेगवेगळी असून त्यात वेगवेगळ्या तिथीत हा सण साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रत पिठोरी किंव्हा दर्श अमावस्येला सर्जा राजाचा पोळा हा सण साजरा केला जातो. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे. मात्र ज्यांच्याकडे शेती नाही ते लोक मातीच्या बैलाची पूजा करतात.

आज बैल काम करत नाही.

पोळाच्या दिवशी शेतकरी राजा आज आपल्या बैला कडून कुठलेही काम करून घेत नाही. आज त्याला आराम दिला जातो. आज बैलाचा स्वतंत्र दिनाचं असतो.

आज नवरदेव बनतो बैल

वर्षभर शेतकऱ्या बरोबर शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी त्यांचे पूजन केले जाते. या दिवशी प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने बैलांचा साजशृंगार करतो. बैलांचा साजशृंगार करताना बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल घातली जाते. नवे वेसण, बाशिंग, गळ्यात माळ आणि शक्य त्या साहित्याद्वारे बैलांना सजवले जाते. त्यानंतर बैलाची मिरवणूक काढली जाते. शेतकरी आपल्या घराची देखील सजावट करत दारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. काही ठिकाणी गावातल्या सर्व बैलजोड्या एकत्र येत वाजंत्री, सनई, ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते.

पुरण पोळीचा नैवेद्य

पोळाच्या दिवशी बैलांची पूजा करून त्यांना खास असा नैवेद्य दिला जातो. नैवेद्यामध्ये विशेतः करून पुरण पोळीचा समावेश असतो. ग्रामीण भागात आजही आमंत्रणावरून बैलजोडी घरोघरी नेली जाते. ज्यांच्या घरी बैलजोडी जाते ते कुटुंब मोठ्या आदराने बैलांचे पाय धुवून हळद-कुंकू लावून बैलांची आरती ओवाळतात. त्यानंतर बैलांना पुरण पोळीचा नैवेद्य दिला जातो.

Previous Post

खांदला येथे लोकसमग्रह समाज सेवा संस्थाच्या आणि मानोस युनिदास यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर

Next Post

पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने बैलांना आंघोळ करण्यासाठी नेलं, तलावात बुडून काका- पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने बैलांना आंघोळ करण्यासाठी नेलं, तलावात बुडून काका- पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू.

पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने बैलांना आंघोळ करण्यासाठी नेलं, तलावात बुडून काका- पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In