लेखक – प्रशांत जगताप, महाराष्ट्र संदेश न्युज
शिंगे घासली, बाशिंगे लावली माढुळी बांधली, म्होरकी आवळली तोडे चढविले, कासारा ओढला घुंगुरमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैल पोळा.
बळीराजाच्या बरोबर वर्षभर शेतात राबून आपल्या अन्न धान्याचा पोशिंदा बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हर वर्षी बैल पोळा मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात साजरा केला जातो. महाराष्ट्रात पोळा या सणाचे एक विशेष महत्त्व आहे. श्रावणात पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात बैल पोळा साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी सर्जा राजाने वर्षभर नीष्ठेने केलेल्या कार्यासाठी बैलांप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानतो.
आज कितीही यांत्रकीकरण झाले तरी बैलाची जी किंमत आहे. ती काही कमी झालेली नाही आणि ती कधीच कमी होणार पण नाही. निसार्थ कष्टाचं उदाहरण देण्यात आल तर सर्वात अगोदर आपल्या शेतकऱ्याचा बैलाच नाव अगोदर येत. बैला शिवाय शेतीला किंमत नाही, शेतकऱ्या शिवाय माती उगवत नाही.
महाराष्ट्रासह देशातील विविध भागात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण हा साजरा केला जातो. मात्र प्रत्येक राज्यात परंपरा आणि मान्यता वेगवेगळी असून त्यात वेगवेगळ्या तिथीत हा सण साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रत पिठोरी किंव्हा दर्श अमावस्येला सर्जा राजाचा पोळा हा सण साजरा केला जातो. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे. मात्र ज्यांच्याकडे शेती नाही ते लोक मातीच्या बैलाची पूजा करतात.
आज बैल काम करत नाही.
पोळाच्या दिवशी शेतकरी राजा आज आपल्या बैला कडून कुठलेही काम करून घेत नाही. आज त्याला आराम दिला जातो. आज बैलाचा स्वतंत्र दिनाचं असतो.
आज नवरदेव बनतो बैल
पुरण पोळीचा नैवेद्य
पोळाच्या दिवशी बैलांची पूजा करून त्यांना खास असा नैवेद्य दिला जातो. नैवेद्यामध्ये विशेतः करून पुरण पोळीचा समावेश असतो. ग्रामीण भागात आजही आमंत्रणावरून बैलजोडी घरोघरी नेली जाते. ज्यांच्या घरी बैलजोडी जाते ते कुटुंब मोठ्या आदराने बैलांचे पाय धुवून हळद-कुंकू लावून बैलांची आरती ओवाळतात. त्यानंतर बैलांना पुरण पोळीचा नैवेद्य दिला जातो.