निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोयगाव:- दि. 5 ऑगस्ट ला राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे लोकशाही मार्गाने छात्र संघ निवडणूक २०२३-२४ घेऊन शालेय मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी देशाचे आणि राज्याचे सार्वत्रिक निवडणुकी सारखी उमेदवारांना चिन्ह देण्यात आले. तसेच नोटा चिन्हाचा वापर करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी शालेय मंत्रीमंडळपुढील प्रमाणे निवडण्यात आले. मुख्यमंत्री पदी प्रतीक गजानन आगलावे वर्ग १० वा यांची निवड झाली. शालेय शिक्षण मंत्री कु. श्रुतिका संजय पारखी वर्ग १० वा, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री कु. वैष्णवी राजेंद्र वरारकर वर्ग ७ वा, पर्यावरण व स्वच्छता मंत्री कु. दुल्हन अनिल गेडाम वर्ग ८ वा, अन्न व पाणी पुरवठा मंत्री शुभम गजानन आगलावे वर्ग ८ वा, महिला व बालकल्याण मंत्री कु. नियता बंडू पिंपळशेंडे वर्ग – ९ वा यांची लोकशाही मार्गाने निवड करण्यात आली.
ही निवडणूक राजेंद्र विद्यालय भोयगावचे मुख्याध्यापक व्ही. एस. चटप यांचे मार्गदर्शना खाली घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. एम. लांडे यांनी निवडणूक प्रक्रियेचे नियोजन केले. मतदान अधिकारी म्हणून बी. झेड. निखाडे, मतदान अधिकारी एक कु. व्हि. टी. वैद्य व मतदान अधिकारी दोन कु. एस. एन. गाडगे यांनी चोख कामगिरी पार पाडली. त्यांना चंदन चायकाटे (लिपिक), डी. आर. चिने व व्ही. बी. वनकर यांनी सहकार्य केले. अशाप्रकारे लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्यात येवून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348