✒️राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी ( पवई )
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणा नुसार मुस्लिम आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली.
मुस्लीम समाजाला देण्यात आलेले आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लीम समाजाला देण्यात आले होते. मा. उच्च न्यायालयानेही विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत सामिल करुन शैक्षणिक आरक्षण बहाल केले व नोकरीतील आरक्षण पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली होती. मागील ९ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत आहे. मुस्लीम समाजात ५० घटक आहेत, याचा सर्वंकष विचार करुन मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंती नसीम खान यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपासणी करुन योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. असेही नसीम खान यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348