लेखिका: सीमा सुरुशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
हा उभा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी अनेक संत महापुरुषांनी आपले जीवन अर्पण केले. त्यात अनेक महिलानी आपल्या कर्तुत्वाने या उभ्या समाजाला नवउभारी दिली. त्यात आदर्श महिलांचा तर महाराष्ट्राला दैवी देणगी आहे. आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रेरणादायी व्यक्तीमत्वांसोबत विविधतेने नटलेली येथील रंगीबेरंगी संस्कृती आपणास पाहायला मिळते. यामध्ये अशा अनेक कर्तृत्ववान आणि नावाजलेल्या स्त्रियांचा देखील समावेश आहे ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक मोठी अविस्मरणीय, उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरणा मिळेल अशी धाडसाची कामे केली. आजच्या लेखात आपण अशाच एका कर्तृत्ववान धाडसी आणि प्रेरणादायी स्त्रियांविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
आपण आज बघणार आहोत अशात एक कर्तुत्ववान महिला सोनालीताई ठाकूर यांची यशोगाथा
या कवितेच्या ओळीतून सोनालीताईचे…
महिला हिताचा विचार भारी,
वेळे प्रसंगी काट्यावरही चालणारी सोनालीताई न्यारी..
आपल्या अस्तित्वाने सर्वांवर मात करणारी
समाजातील बंधनाने तोडून नव उभारी देणारी,
प्रत्येकाच्या जीवनात सखी सारखी उभी असलेली सोनाली न्यारी. कधीही न घाबरणारी नारी अशी.
अन्यायावर तुटून पडणारी किमया जशी.
अशी ही नारी सोनालीताई आहे सर्वांवर भारी..
सोनालीताई ठाकूर… महाराष्ट्रतील वाशिम येथील सोनालीताई ठाकूर , महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या आणि एक प्रामाणिक राजकीय नेत्या आहेत. सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे हा बेत नेहमी त्यांचा ध्यानी मनी वसलेला आहे. त्यासाठी कुठलीही तडजोड नाही. अगोदर सर्वांचे कल्याण मग माझे हे विचार त्यांना इतर राजकीय पक्षाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या पेक्षा वेगळं करते.
सोनालिताई ठाकूर या मागील अनेक वर्षांपासून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करून त्यांनी आपला सामाजिक दर्जा मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. सोनालीताई ठाकूर या त्यांच्या आचरणातुन, विचारातुन आयुष्य कसे जगावे, कसे असावे हे शिकवतात. समाजाचे कार्य करून प्रत्येक समाजाच्या मनरुपी उरावे.. असा त्यांचा जगण्याचा आदर्शपणा. घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सोनालीताई समाजकारण करण्यासाठी राजकरणात आल्या. त्यांचा विविध पैलूंवर अभ्यास करून आपल्या परिसरातील नागरिकांचे प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी त्या नेहमी झटत असतात.
आज राज्यातील अनेक विविहातेचा छळ होतो. त्यात सोनाली ताईचा पण अतोनात छळ सासरच्या मंडळींनी केला. पण परिस्थिती बदलत असते. आणि सोनाली ताई यांनी ही परिस्थिती आपल्या कर्तुत्वाने बदलवली. आता पूर्वी छळ सोसणाऱ्या सोनालीताई आता महिलांचा छळ करणाऱ्या साठी दरारा आहे. आणि अशा महिलेसाठी एक आधारस्तंभ आहे.
महिला अत्याचाऱ्यावर तुटून पडणाऱ्या सोनालीताई..
आज देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात महिला मुलीवर अत्याचार सुरू आहे. अशा नराधमाना पोलीसांचा आणि कायद्याचा धाक आहे की नाही हे मागील अनेक वर्षापासून घडत असलेल्या घटनेवरून समोर येत आहे. त्यामुळे आज सामाजिक जानीवेतून सोनालीताई यांनी एक टीम तयार केली. वाशिम जिल्हात कुठेही महीलेवर अत्याचार झाली की त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी कमर कसून उभ्या राहतात. आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वात 500 पेक्षा जास्त महिलाना त्यांनी न्याय मिळवून दिला.
शासनाने महिलांची सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरण यासाठीच्या अनेक उपाययोजना राबवित आहे. पण जो पर्यंत या योजना जमीनी येऊन राबविल्या जात नाही तर या योजनेचे उद्देश सफल होणार नाही. असे सोनाली ठाकूर त्यांचं मत आहे. आम्ही महिलांच्या जीवन चक्रात त्यांच्यावर सतत परिणाम करणाऱ्या समस्या सोडवून आणि केंद्राभिमुखता तसेच नागरी हक्कांच्या माध्यमातून त्यांना उभारणीत हातभार लावून प्रत्यक्षात साकारण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच हिंसा आणि धाकदपटशामुक्त वातावरणात त्यांना त्यांचे मन आणि शरीर या दोन्हींच्या बाबतीत मुक्तपणे निर्णय घेण्याची संधी मिळणे या उद्देशाने आज मी कार्य करत आहे. जेव्हा घरातील महिला शिकून सवरून पुढे जाईल तेव्हाच समाज आणि कुटुंब समोर जाणार. महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. पण प्रत्येक क्षेत्रात त्यांना पुरुषी अहंकाराला समोर जाव लागत आहे. हे वातावरण बदल करण्यासाठी आमचा सतत लढा सुरू आहे. एक दिवस आम्ही नक्कीच प्रत्येक महिलांच्या जीवनात नवीन सूर्यदय उदयास आणू. त्यासाठी आम्ही अनेक मोर्चावर कार्य करत आहे. असे मत यावेळी सोनाली ताई यांनी महाराष्ट्र संदेश न्युज जवळ व्यक्त केलं.
– महिला आणि मुलीच्या सबलीकरणास प्रोत्साहन.
– ‘हुंडा देणार नाही आणि घेणारही नाही’ हा निश्चय.
– लिंगनिदान करून स्त्रीलिंगी गर्भसमापन करणार नाही, ही प्रतिज्ञा.
– महिलांवरील सामाजिक अथवा कौटुंबिक हिंसा सहन करणार नाही, हा खंबीर दृढनिश्चय
– मुलींना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करीन, हे आश्वासन.
– महिलांच्या आणि मुलींच्या आरोग्याची काळजी.
या विषयावर सोनाली ताई ठाकूर या मागील अनेक वर्षांपासून कार्य करत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348