कवठेमहांकाळ येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घाऊ वाटप
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यदिना निमित्त हिंगणगाव तालुका कवठेमहांकाळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घाऊ वाटप करून साजरा करण्यात आले संस्थापक अध्यक्ष मा. उमरफारुक ककमरी यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या नेतृत्वाखालील हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच सेवक कामगार संघटनेची यशस्वी वाटचाल पाहता अनेक सेवकांची वेगवेगळ्या समस्यांवर सक्रिय काम करण्यासाठी संपर्क होणे आणि समस्या जाणून घेणे हि फार महत्त्वपूर्ण बाब असुन त्या साठी आरोग्य क्षेत्रातील कर्तव्यदक्ष सेवकांसाठी जिल्हाध्यक्ष मा. विज्ञान लोंढे यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. उमरफारुक ककमरी यांच्या हस्ते कवठेमहांकाळ शहरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळेस उमरफारुक ककमरी यांनी विज्ञान लोंढे यांच्या सक्रिय कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तसेच आरोग्य सेवकांस आव्हान केले कि आरोग्य क्षेत्रातील कामाबद्दल कोणतीही समस्या असतील तर त्यांनी सेवक कामगार संघटनेच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा त्या सेवकास न्याय मिळवून देऊ त्या वेळेस जिल्हाउपाध्यक्ष हरीश वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, अलोक कांबळे, तनमय गाडे, आर्यन काबले, आदेश श्रीवास्तव, प्रतिक, नेहाल लोंढे, आकाश भोसले, गैवरव लोंढे, शूभम चवाण, निखिल शेळके, प्रानंल कांबळे, पारस कांबळे, रितेश लोंढे, सूशानंत पाटील, राज लोंढे, प्रसाद, साहिल कांबळे, संतोष करपे राजू आबा लोंढे आदी उपस्थित होते.