पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वानवडी परिसरातील सय्यदनगरमध्ये घरगुती कारणावरून दोन गटांमध्ये वादातून तुंबळ हाणामारी झाली असू एकाचा खून करण्यात आला आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (दि. 17 ) रोजी सय्यदनगर परिसरात घडली आहे. आजीम शेख उर्फ बावा (24) असू खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आजीम याला पुणे पोलिसांनी तडीपार केले आहे. तरी देखील तो पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सय्यदनगरमध्ये आला होता. घरगुती कारणावरून आजीम आणि गटांमध्ये वाद भडकला आहे. त्यामध् चा खून झाला आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. इतर दोघांची बोटे छाटण्यात आली आहेत अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे , सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्यार पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना आहेत.