🖋️ महेन्द्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रशासनाने ‘ड्राय डे’ जाहीर केला असतानाही बेकायदा दारूची विक्री करणार्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा मारून सुमारे 6 हजार 300 रुपये किमतीचा दारुसाठा जप्त केला. या प्रकरणी हॉटेल चालकावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गणेश चतुर्थी असल्याने शहरात सर्वत्र गणेश उत्सवाची धूम सुरू आहे.शासकिय नियमानुसार आज दारुविक्री बंद असते. परंतू या बंदचा गैरफायदा घेत अनेक दारू विक्री करणार्या दुकानदारांनी चढ्या दराने मागच्या दरवाजाने दारुविक्री करीत होते.
याबाबतचा शहरातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याने व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला. या व्हिडीओची माहिती संगमनेर शहराचे पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांना समजली. त्यांनी तत्काळ दखल घेत शहरातील पार्वती कॉम्प्लेक्समधील हॉटेल श्री सागर या हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी दीपक रमाकांत बिस्वाल याला 6 हजार 300 रुपये किमतीची विदेशी दारू यात 180 मिलीच्या 45 बाटल्यांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दीपक बिस्वाल यांच्या विरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमनेर पोलिस करत आहे. या घटनेमुळे अवैध दारुविक्री करणार्यांमध्ये खळबळ उडालेली आहे.

