सौ.हनीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्हातील बल्लारपूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. राजकीय दडशाहीमुळे हे संतापजनक प्रकरण दाबण्यात आले आहे.
बल्लारपूरच्या स्थानीय महाराणा प्रताप वार्ड मध्ये स्थित कम्प्यूटरचे शिक्षण देणारे इंस्टीट्यूट मध्ये टियुशन शिकवणाऱ्या संचालकाने आठव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर छेडछाड करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितनुसार महाराष्ट्र संदेश न्युजला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कम्प्य़ूटरच शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या संचालकला राजकीय संरक्षण प्राप्त असल्यामुळे त्याच्या विरोधात कुणी समोर येऊन या विरोधात आवाज उठवत नाही. त्यामुळे त्या संचालकांवर कारवाई करण्यात येत नाही. कारण की, सत्ताधारी पक्षाचे मोठ्या नेत्या बरोबर त्याच उठण बसन आहे. वाढदिवसाच्या बॅनरवर या नेत्यांबरोबर फोटो छापण्यात येते.
30 ऑगस्ट मंगलवारला कम्प्युटर शिक्षण संस्थेत हररोज प्रमाणे अल्पवयीन विध्यार्थी आणि विद्ध्यार्थिनी टियुशन घेण्यासाठी येत असतात, त्यावेळी एकट्यात एक मुली बरोबर संस्थेचा संचालका द्वारा छेडछाड करण्यात आली. त्यामुलीने याचा विरोध करून कशीतरी ती तिथून निघून जाते. तिला काहीच समजत नाही आपल्या बरोबर काय होत आहे. ती घरी जाऊन हिम्मत करते आणि आपल्या बरोबर जे वाईट घडल ते सर्व आपल्या कुटुंबाला सांगते.
आपल्या मुली बरोबर संस्थेचा संचालकाने वाईट कृत्य केल याच्या जबाब विचारण्यासाठी तिचे कुटुंब संस्थेत गेले असता. तो संचालक कॉम्प्युटर इंस्टीट्यूट बंद करून तिथून फरार झाला. त्यानंरत तिचे कुटुंब त्या शिक्षकी पेशेला काळीमा फासणाऱ्या शिक्षकाचा शोध घेतात तर तो हनुमान मंदिर जवळ दिसून येतो तर त्याची खातिरदारी करण्यात येते.
अशा नराधम व्यक्तीला समाजात राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्याला पुलिस स्टेशनला नेत असताना एका राजकीय पुढाऱ्यांने मुलीच्या बदनामीचे भय दाखवून या संतापजनक घटना लपवण्यात मदत केली. त्यानंतर संचालकाने माफी मागून दोन्ही पक्षांना घरी पाठवण्यात आले.
आज देशात महिला अत्याचाराचे मोठे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे हे संतापजनक प्रकरण माफ करण्यासारखं आहे? राजकीय नेत्याचा आशीर्वाद असेल तर तो मुलीबरोबर बलात्कार सारख्या गंभीर गुन्हा पण करू शकतो याची कुणी शक्यता नाकारू शकत नाही.
शिक्षण क्षेत्र हे पवित्र आहे त्याला बदनाम करण्याचे आमचा उद्देश्य नाही. पिढीत मुलीच्या कुटुंब आणि संस्थेचा संचालकामध्ये झालेल्या समझोत्यामुळे आम्ही या इंस्टीट्यूट व नराधम संचालकाचे नाम प्रकाशित नाही करत आहोत. पण मागील दोन दिवसापासून हे इंस्टीट्यूट बंद आहे. त्यातील टियुशन घेणारे विद्यार्थी परत जात आहे. पण आम्ही मुलींना सावधान करण्यासाठी जनहितात लिहत आहोत.

