Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे शहर पोलीसांची पुण्यातील भगिनिंना रक्षा बंधनाची अनोखी भेट पुण्यामध्ये चैन स्नैचिंग करणाऱ्या दोन टोळ्यांचे ०६ सराईत आरोपी जेरबंद..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 30, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहर पोलीसांची पुण्यातील भगिनिंना रक्षा बंधनाची अनोखी भेट पुण्यामध्ये चैन स्नैचिंग करणाऱ्या दोन टोळ्यांचे ०६ सराईत आरोपी जेरबंद..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :-दिनांक:- २४/०८/२०२३ रोजी रात्रौ ०९/३० वा थे सुमारास ई-लर्निंग चौक पर्वती दर्शन पुणे येथून रिक्षातुन जाणाऱ्या एका महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चैन स्नॅचिंग करून दुचाकीवरील दोघे चोरटे पसार झाले त्याबाबत पर्वती मो.स्टे. येथे गु.र.नं. २४६/ २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. तसेच त्याच दिवशी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे रात्रौ २१/०० वा चे सुमारास गुन्हा रजि. नं. १८४ / २०२३ भादवि कलम ३९२.३४ प्रमाणे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल होता. दाखल दोन्ही गुन्हयाची अति वरिष्ठ पोलीस अधिकान्यानी दखल घेवून •आरोपींचा शोध तात्काळ घणेकामी पर्वती पोलीसांना आदेशीत केले होते. त्यानुसार मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. आप्पासाहेब शेवाळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पर्वती पोलीस ठाणे यांना तात्काळ तपास पथकातील अंमलदारांची चार पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातून कारवाई करण्यास सांगितल त्याप्रमाणे पर्वती पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुनिल जगदाळे, चंद्रकांत कामठे व तपास पथक अमलदार हे घटनास्थळापासून विवीध प्रकारे आरोपींचा सी. सी. टी.व्हि. पाहून शोध घेत असताना पोलीस नाईक प्रकाश मरगजे व पोलीस अमलदार किशोर वळे यांना सी. सी. टी.व्हि. फुटेज पाहुन आरोपीचे गाडीची व आरोपीची माहिती मिळाली. अधिक माहिती घेतली असता सदरचे आरोपी गुन्हा करून संगम बिज, पुणे येथून त्यांचे मुळ गाव जळगाव येथे ट्रॅव्हल्सने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना कळवुन त्याचे मार्गदर्शनाखाली व्यवस्थीत सापळा रचुन आरोपी पळुन जाण्यापुर्वी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे १) आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी, वय २५ वर्षे, रा. सध्या राहणार- फ्लॅट नं ४०५, गुरुकृपा अपार्टमेंट, टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज, पुणे, मुळगाव- सात खोल्याजवळ, प्रजापतनगर, मंबुराबाद रोड, जळगाव २) लोकेश मुकुंदा महाजन, वय २४ वर्षे, रा. सध्या राहणार सदर मुळगाव प्लॉट नं ०७, गट नं १२ समर्थनगर, खेडी बुद्रुक, जळगाव अशी असल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे पोलीस पध्दतीने तपास करता त्यांनी वरील चैन स्नॅचिंग केल्याचे कबुल केल्याने त्यांना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी घेतली असता त्यांनी जळगाव येथून येऊन पुणे शहरातील भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर, विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत त्याचे साथीदार मित्र यांचेसह व मदतीने चैनस्नॅचिंग केल्याचे कबुल केल्याने तात्काळ पोलीसांनी तपासकामी जळगाव येथे जावुन धाडसाने त्यांचे मुळ गावातुन आरोपी नामे १) प्रसाद उर्फ परेश संजय महाजन वय २५ वर्षे, रा. प्लॉट न. १ ज्ञानदेव नगर जळगाव महाराष्ट्र २) संदीप अरविंद पाटील वय २८ वर्षे, रा. काचननगर, स्वामी समर्थ केंद्राचे मागे, जळगाव महाराष्ट्र ३) दिपक रमेश शिरसाठ वय २५ वर्षे, रा. मु/पो- वरखेडी, ता- पाचोरा, जि- जळगाव महाराष्ट्र यांना सुद्धा ताब्यात घेतले व त्यांनी सुध्दा जळगाव येथुन पुण्यात येऊन चैनस्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे. यातील आरोपीनी जळगाव येथून येऊन दत्तनगर कात्रज भागात राहुन पुणे शहरात ०५ ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याचे निष्पन्न झाले असून पर्वती भारती विद्यापीठ, सहाकरनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस स्टेशनमधील ०५ गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले आहेत आरोपींवर यापुर्वी देखील जळगाव, अकोला, पुणे अमरावती शहरात चैन स्नॅचिंगचे सुमारे ३० च्या वर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींनी गुन्हा कबुल केल्याने त्याचेकडुन सुमारे १,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना गुन्हयांत अटक करण्यात आली आहे. आरोपी हे अकोला, जळगाव, अमरावती पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्या भागातुन येवुन त्यांनी पुण्यात येवुन चैन स्नॅचिंग सुरु केल्या होत्या. मात्र पर्वती पोलीसांच्या सतर्कतेमुळे सोन साखळी चोराचे जळगाव कनेक्शन उघड झाले असुन त्यांचे आणखीण कोण साथीदार आहेत काय आणि अटक आरोपीनी आणखीण यापूर्वी पुणे शहरात चैन स्नॅचिंग केली अगर कसे याचा सखोल तपास पर्वती पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक सुनिल जगदाळे हे करीत आहेत. तसेच सोन साखळी चोरांना जरब बसावी म्हणुन पर्वती पोलीसांकडुन सदर आरोपींवर कठोरात कठोर कायद्यान्वये कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे..

सदरची कारवाई ही माअपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. प्रविण पाटील, पोलीस उप- आयुक्त सो परि ३ मा सुहैल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुनिल जगदाळे, चंद्रकांत कामठे पो. हवा. कुंदन शिंदे, पो. अं. प्रकाश मरगजे, किशोर वळे, अमित सुर्वे, अनिस तांबोळी, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे-पाटील, नवनाथ भोसले, अमोल दबडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर शिंदे व पुरुषोत्तम गुन्ला यांनी केली आहे.

Previous Post

समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी !घरफोडी करणा-या तडीपार सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद

Next Post

हिंगणघाट शहरात बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियंत्रण शाखेचे दुचाकी वाहन रोड उभे करणाऱ्याविरुद्ध जप्तीची धडक मोहीम.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट शहरात बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियंत्रण शाखेचे दुचाकी वाहन रोड उभे करणाऱ्याविरुद्ध जप्तीची धडक मोहीम.

हिंगणघाट शहरात बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियंत्रण शाखेचे दुचाकी वाहन रोड उभे करणाऱ्याविरुद्ध जप्तीची धडक मोहीम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In