✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहराचा झपाट्याने विस्तार सुरू आहे. त्यात गाड्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाटसरूचे बेहाल होत आहे. त्यांना रस्त्यावरून चालणे ही मुश्किल झाले आहे. त्यामुळे स्थानिक वाहतूक नियंत्रण शाखेने बसस्थानक, बँक परिसरात कोठेही दुचाकी वाहन रोड वरती उभे करणाऱ्याविरुद्ध जप्तीची धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे वाहनचालकांची धावापळ होऊ लागली आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेने रोडवरील पार्किंग करणाऱ्या वाहनांवर हिंगणघाट वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यासाठी टोइंगची व्याँन कारवाई करणार असल्याची घोषणा केली आहे
त्या घोषणेनुसार वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात टोईंग व्याँन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत बसस्थानक, बँक, बाजार परिसरात कोणत्याही ठिकाणावर रोडवरती उभी आढळणारी दुचाकी उचलून नेण्यात येत आहे. जप्त केलेली ही दुचाकी थेट वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात येते. वाहनचालक आपले वाहन घेण्याकरिता नियोजित ठिकाणावर पोहचता क्षणी त्याला दुचाकी आढळत नसल्याने त्यांची धावपळ सुरु आहे . दुचाकी पोलिसांनी उचलून नेण्याचे कळल्यानंतर मात्र वाहन रचालकांना वाहतूक नियंत्रण शाखेत धाव घ्यावी लागते.
या मोहिमअंतर्गत शहरातील अनेकांना वाहतूक शाखेचे गाडी जप्तीची कारवाई केली माहीत नसल्यामुळे ती मंडळी हिंगणघाट शहर पोलीस ठाण्यात चौकशी करिता जात आहे. वाहन जप्तीनंतर चालकांची होणारी धावापळ कमालीची वाढली आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा अनेक वाहन चालकांनी धसका बसला असून या कारवाईचा सर्वाधिक मनस्ताप महिला व तरुणींना होत असल्याचे चित्र हिंगणघाट शहरात दिसून येत येत आहे.

