खापरी येथे घडली ही खळबळजनक घटना.
प्रविण जगताप, प्रतिनिधी
नागपूर:- येथून एक खळबळजनक आणि दुःखद घटना समोर आली आहे. एका प्रेमी युगुलाच्या प्रेमात नातं आडव आल्याने त्याचा प्रेमाचा अंत हा दुःखदायक झाला. त्यामुळे सर्विकड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रेमी युगुलाने धावत्या सुपर एक्स्प्रेस रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना खापरी येथे घडली आहे. या दोन्ही प्रेमी युगुलाची ओळख पटली असून त्याचे नाव जितेंद्र काशिराम नेवारे वय 35 वर्ष, रा. बाबा फरीदनगर, मानकापूर, नागपूर व स्वाती पप्पू बोपचे वय 19 वर्ष, रा. तुमखेडा, ता. गोरेगाव, जि. गोंदिया अशी मृतक प्रेमी युगुलाची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, जितेंद्र नेवारे हा विवाहित होता. ड्रायव्हर म्हणून काम करायचा. जितेंद्रची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर तो आपल्या आईसोबत एकटाच राहायचा. त्यावेळी जिंतेद्रच्या मावशीची मुलगी स्वाती जिंतेद्रच्या घरी वरचेवर येत होती. पत्नी माहेरी गेल्याने त्याला एकट एकट वाटत होते. त्यामुळे दोघांच्या मनात प्रेम अंकुर फुललं. ते प्रेमात हे पण विसरून गेली की ते दोघं मावश बहिण भाऊ आहोत. दोघांनाही लग्न करायचे विचार कलेला होते. पण नातेवाईक आणि समाज आपल्याला स्वीकारणार नसल्यामुळे दोघांनी टोकाचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार, जितेंद्रची प्रेमिका म्हणजेच मावस बहिण स्वातीला भेटायला गोंदियाला गेला होता. त्यानंतर स्वाती जितेंद्रला भेटण्यासाठी नागपूरला
आली. दोघांनी दिवसभर एकमेकांसोबत वेळ घालवला. त्यांनंतर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह रेल्वेच्या रुळावर आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
पोलिसांना घटनास्थळावरून तुटलेले फोन मिळाले आहेत. या फोनची पूर्ण तपासणी सायबरसेलच्या मदतीने केली आसताना हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. याबाबत हिंगना पोलिस पुढील तपास करत आहेत.

