महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भारतात सुरू असलेल्या क्रिकेटचा महाकुंभ वर्ल्ड कप 2023 आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. त्यात पाकिस्तान टीमची सेमीफायनल गाठता न आल्याने त्यांची मोठी हाहाकिरी झाली. त्यात आता पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार याच्या एका खळबळजनक व्हिडिओ ने मैदानाबाहेर चांगलेच वातावरण तापले आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अब्दुल रज्जाक याने भारतीय प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता माजी कर्णधार इंझमाम उल हक याने भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंह हा इस्लान धर्म स्वीकारण्याच्या विचारात असल्याचं खळबळजनक दावा केला आहे. मात्र या दाव्यानंतर हरभजन सिंह चांगलाच भडकला असून त्यानेही इंजमामची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
इंजमाम हरभजन सिंग बद्दल काय बोलला?
माजी कर्णधार इंझमाम ने मागील एक किस्सा सांगितला, त्यामध्ये पाकिस्तान संघासोबत नमाज अदा करण्यासाठी मौलाना तारिक जमील येत असायचे. त्यावेळी आाम्ही भारतीय खेळाडू मोहम्मद कैफ आणि झहीर खान यांना बोलवायचो. तेव्हा हरभजन सिंह त्यांच्यासोबत यायचा, तो काही नमाज अदा नव्हता करत मात्र त्याला वाटायचं की मौलाना तारिक जे बोलतात ते एकदम योग्य आहे. तेव्हा त्याचा मनात इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या विचारात असल्याचं इंझमाम उल हक याने सांगितलं.
हरभजन सिंगचे प्रत्युत्तर..
इंझमाम कोणती नशा करून बोलत आहे. मला भारतीय आणि शीख असल्याचा अभिमान आहे. बकवास लोकं काहीपण बोलत असल्याचं सांगत हरभजन सिंहने म्हटलं आहे. हरभजन सिंहने इंजमाम याच्या व्हिडीओला प्रत्युत्तर दिलं आहे. यावरून हरभजन सिंह इंजमाम याने केलेला दावा खोटा असल्याचं दिसत आहे. नेटकऱ्यांनीही इंजमाम याला ट्रोल केलं असून भज्जीच्या मागे समर्थपणे उभे राहिले आहेत.
दरम्यान, वर्ल्ड कप 2023 संघाचा इंजमाम हा मुख्य निवडकर्ता होता. मात्र तुम्ही पाहिलं असेल की पाकिस्तान संघाचं एकदम गचाळ प्रदर्शन संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं यावर इंजमाम परत काही बोलतो का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.