मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाले तरीही लोहार व तिच्या उपजमातीच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. हा समाज अतिशय मागास अशिक्षित व अविकसित असल्याने पूर्वी अनुसूचित जमातीमध्ये समावेश होता व आजही तीच परिस्थिती कायम आहे. परंतु 1976 च्या अनुसूचित जाती जमाती सुधारणा आदेशात या जमातीचा उल्लेख वगळण्यात आला. त्यामुळे या जमातीवर घोर अन्याय झालेला आहे. तरी या जमातीस शासनाने अनुसूचित जमातीच्या सवलती पूर्ववत लागू कराव्यात अशी मागणी नागपूर येथील लोहार समाजाच्या राज्यस्तरीय 9 व्या महाअधिवेशनात लोहार समाजाचे ज्येष्ठ नेते लोहार समाज संघटना( महाराष्ट्र) नागपूरचे अध्यक्ष सदाशिवराव हिवलेकर, सकल लोहार समाज मंच साताऱ्याचे अध्यक्ष हनुमंतराव चव्हाण, हिंदू लोहार समाज संघ मुंबईचे अध्यक्ष अण्णा जोशी यांनी केली आहे.
वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ, नागपूर यांच्यातर्फे चक्रधरनगर जुना सुभेदार क्रिडा मैदान नागपूर येथे आयोजित अधिवेशनात मान्यवरांनी विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महासंघाचे अध्यक्ष चरणदास बावने होते. या अधिवेशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय गोंड महासभा उपाध्यक्ष शिडाम अर्जुगारु असिफाबाद तेलंगणा, कम्मारा सेवा संघम आदीलाबाद जिल्हाध्यक्ष सिताराम सुर्तीकर, तेलंगणातील कुमरमभीमचे जिल्हाध्यक्ष बाबुराव बावणे, स्वागताध्यक्ष एल.डी.सतीकोसरे, मुख्यसंयोजक एस. ए. मांडवगडे, कार्याध्यक्ष मा.बा. पडघन, मुख्य संपादक सु.फ. मांडवकर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य चरणदास बावने यांनी लोहार ही जमात आदिम जमात आहे. त्यामुळे या जमातीला आदिम जमातीच्या सवलती पूर्ववत लागू करणे अगत्याचे आहे. शासनकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर या जमातीची विभागणी इतर मागासवर्ग व भटक्या जमातीमध्ये करून मोठा अन्याय केला आहे. पूर्वी लोहारांना 1941 च्या शासन परिपत्रकानुसार मध्यप्रांत व वऱ्हाड प्रांतात आदिम जमातीच्या सवलती मिळत होत्या असे प्रतिपादन केले . मुख्यसंयोजक सुरेश मांडवगडे यांनी प्रास्ताविक भाषणातून शासनाकडे केलेल्या विविध मागण्याची माहिती दिली.
त्यामध्ये कमार जमातीच्या उपजमाती म्हणून यादीतील क्रमांक 20 वर लोहार व तिच्या उपजमातीचा समावेश करून अनुसूचित जमातीच्या सवलती त्वरित लागू कराव्या. लोहार समाजासाठी विश्वकर्मा आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्यात यावी. लोहार व सुतार यांना सवलतीच्या दरात लोखंड व लाकूड उपलब्ध करून देण्यात यावे. 15 इंची व 18 इंची मशीनद्वारे लाकूड कापण्याचे काम शासनाने 2018 पासून बंद केले ते पूर्ववत सुरू करावे. आदी मागण्या केल्या. आमच्या मागण्या ऐकून घेण्यास राज्यकर्ते मंत्री कार्यक्रमात न आल्याने महासंघाच्या शिष्टमंडळाद्वारे मंत्रालयात जाऊन मंत्र्यांकडे निवेदन सादर करून समक्ष चर्चा करण्यात येईल असे मांडवगडे यांनी सांगितले. राज्यस्तरीय महाअधिवेशनानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ क्लिप द्वारे या समाजाच्या सदैव पाठीशी राहीन. सहकार्य करीन असे आश्वासन दिले.
दोन दिवशीय चाललेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे उदघाटन नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहन मते यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महासंघाचे माजी कार्याध्यक्ष ल.ना. मोरे होते.यावेळी माजी नगरसेविका स्वाती आखतकर , माजी नगरसेवक सुभाष भोयर, साप्ताहिक लोहसंस्कार कोडकीचे संपादक हनुमंतराव चव्हाण , समाजसेवक प्रभाकर लाड अहमदनगर, समाजसेविका माजी सरपंच सुनिताताई लोहार सातारा, आळंदी गाडीलोहार धर्मशाळेचे अध्यक्ष पुणेचे दिलीप थोरात , समाज सेवक संजय कोळंबेकर मुंबई, उमरखेडचे समाजसेविका अड. अस्मिता आढावे , मुंबईचे विलासराव अंकुशे, औरंगाबादचे संदिपान थोरात, दादूलाल बोरकर, पालघरचे जिल्हाध्यक्ष संतोष जोशी, साताऱ्याचे मार्गदर्शक नामदेव लोहार, उपाध्यक्ष मधूकर शेंडे आदी मान्यवरांनी समाज विकासावर समाजाला मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी राज्यस्तरीय वधु वर परिचय संमेलनात समाजातील 250 युवक युवतीने परिचय दिला. ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाअधिवेशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती नागपूरचे अध्यक्ष एल.डि. सतीकोसरे, महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य चरणदास बावणे, मुख्य संयोजक सुरेश मांडवगडे, उपाध्यक्ष मधुकर शेंडे, उपाध्यक्ष प्रमोद मेश्राम, जमनादास सोनटक्के, कोषाध्यक्ष रामदास शेंडे , उपसंयोजक अनिल मेश्राम, सह कोषाध्यक्ष एम.बी.पडघन, मुख्यसंपादक सुरेश मांडवकर, संपादक सुधाकर चंदनखेडे, उपसंपादक जितेश मेश्राम, जाहिरात प्रमुख धर्मदास नैताम, उपसंयोजक बाबाराव सोनवणे, सहसचिव उत्तम शेंडे, रमेश हजारे, ईश्वर मांडवकर, प्रदीप हजारे, दिनकर सोनटक्के, रमेश बामनकर, साईनाथ हजारे, नागेश पेटकर, कवडू पेटकर, पी एस मेश्राम, बिसन चंदनखेडे, योगेश सोनटक्के, सिताराम निंदेकर, गुलाब कुमरे, नरेश हजारे, भोजराज बागडे, मोहन मेश्राम, महिला प्रमुख रंजना सोनवणे, रागिनी मेश्राम, शशिकला शेंडे, करुणा कोसेकर, अनिता कुमरे, स्वाती चंदनखेडे, ओंकार घुगुसकर, शामराव चाफेकर, राजू कोल्हे,राजू पावनकर, गोपाल शेंडे, के.बी. चौधरी, विठ्ठल घुगुसकर, फत्तुजी बावणे, चंद्रकांत शेंडे, महेश मेश्राम, मोरेश्वर चून्नरकर, महेश मोवळे, संजय डांगरे, सर्व जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख व नागपुरातील गाडी लोहार समाज संघटना, लोहार समाज मित्र मंडळ, जागृतेश्वर देवस्थान कमिटी, लोहार समाज संघटना (महाराष्ट्र) चे सर्व पदाधिकारी व सदस्य, आयोजन समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम केले. आणि अतिशय उत्तम कार्यक्रम घडवून आणला. दोन्ही दिवशी सर्व समाज बंधू भगिनींचे नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. या महाअधिवेशनामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि गुजरात राज्यातून सुमारे 12000 समाज बांधव उपस्थित झालेले होते या माध्यमातून समाजाचे एक उत्तम संघटन दिसून आले.