यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरला आहे.
एमबीबीएस करून डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या शिवानी ढोले या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानी ढोले ही वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. गुरुवारी दिनांक 28 डिसेंबर ला मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास शिवानीने गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे. तिच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मृतक शिवानी ढोले ही मूळची धाराशिवची असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शिवानीच्या आत्महत्या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. तर दुसरीकडे मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून आत्महत्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.