राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- यंदाच्या वर्षातील शेवटच्या दिवशी रविवार आल्याने त्या दिवशी प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने रविवारी दिवसाचा ब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वेने मात्र माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. दरम्यान शनिवारी मध्यरात्री वसई रोड ते वैतरणादरम्यान अप – डाउन जलद मार्गावर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग) स्थानक- माटुंगा ते मुलुंड मार्ग- अप-डाउन जलद वेळ- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ परिणाम- ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे स्थानक- पनवेल ते वाशी मार्ग- अप-डाउन वेळ- सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ परिणाम- ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, ठाणे ते वाशी/नेरूळ आणि ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप-डाउन लोकल रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. बेलापूर/नेरूळ- खारकोपरदरम्यान लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
पश्चिम रेल्वेस्थानक- वसई रोड ते वैतरणा मार्ग- अप-डाउन जलद वेळ- शनिवारी रात्री ११.५० ते रविवारी पहाटे ४.३५ परिणाम- ब्लॉक वेळेत गाडी क्रमांक १९१०१ विरार-भरूच रविवारी पहाटे ४.३५ ऐवजी ४.५० वाजता (१५ मिनिटे उशिराने) रवाना होणार आहे.

