आशिष गजभिये, सावनेर शहर प्रतिनिधी
सावनेर:- केळवद मटन चिकन मार्केट इमारतीच्या बांधकामात निष्कृष्ट साहित्याचा वापर केल्याचा ठपका ठेवत केळवद तालुका सावनेर येथील सरपंच गीतांजली वानखेडे यांना तात्कालीन अपर आयुक्त संजय धिवरे यांनी अपात्र घोषित केले होते त्यांच्या या आदेशाला ग्राम विकास मंत्राचे उपसचिव श्रीकांत लोंढे यांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे गीतांजली वानखेडे यांचा सरपंच पदाचा पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपा समर्थित गटाच्या माध्यमातून सरपंच पदी निवडून आल्या होत्या ग्रामपंचायत 16 डिसेंबर 2017 रोजीच्या मासिक सभेत गावात मटन चिकन मार्केटची इमारत बांधण्याचा ठराव पारित केला होता. त्यासाठी एक लाख 2हजार 571 रुपयाचा निधी प्रस्तावित केला होता या बांधकामात निष्कृष्ट साहित्य वापरणे दवंडी न देणे दवंडीचे खोटे कागदपत्र जोडणे निविदा प्रक्रिया अयोग्य या पद्धतीने हाताळणे अंधार पत्रक कक्ष बाहेर बांधकाम करणे आदी बाबीचा ठपका ठेवण्यात आला होता या प्रकरणात तात्कालीन अपार आयुक्त संजय धिवरे यांनी आकाश 2019 मध्ये निविदा देश सरपंच गीतांजली वानखेडे यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित केले होते.
गीतांजली वानखेडे यांनी या आदेशाविरोधात ग्राम विकास मंत्रालयाकडे अपीलाद्वारे दाद मागितली त्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्रालयाचे उपसचिव स्वीकार लोंढे यांनी अपार आयुक्त संजय देवरे यांच्या आदेशाला नुकतीच स्थगिती दिली आहे या संदर्भात ग्राम विकास मंत्रालयाचे खाजगी सचिव व नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी व खेडवळचे सरपंच व कार्यकर्त्यांनी लेखी कळविण्यात आले आहे

