विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक 17 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त पोलीस मदत केंद्र बोलेपल्ली येथे रक्तदान शिबिर व भव्य जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पुनम लोहबरे मॅडम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर, विशाल कुरेकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मुलचेरा शाखा प्रबंधक, श्री. एनगंटीवार (वनपाल), केसरी तेलामी (सरपंच देवदा) मस्तरी झोरे,मारुती पल्लो, मनोहर तिम्मा, वनिता तिमा (मा पं स सभापती मुलचेरा) उसेंडी मॅडम (तलाठी बोलेपली) व हद्दीतील सर्व नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने यांनी केले. यावेळी हद्दीतील प्रतिष्ठित नागरिकांनी या कार्यक्रमात आपल्या समस्या मांडल्या. त्यात बोलेपल्ली येथे महावितरणचे 33kv उपकेंद्र ची मागणी करण्यात आली अध्यक्षही भाषणात डॉक्टर सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली यांनी नागरिकांना पोलीस दादाला खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले नागरिकांनी मांडलेल्या समस्याचे निराकरण करणे बाबत आश्वस्त केले.
यावेळी रक्तदान शिबिरात 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रक्तदान केले बाबत प्रमाणपत्र देण्यात आले. या मेळाव्यात पुरुष यांना टॉवेल, महिलांना साड्या वाटप, शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये फवारणीपंप, टोपली इत्यादीचा समावेश होता. या मेळाव्यात पंतप्रधान उज्वला गॅस नवीन जोडणी, आधार कार्ड, पॅन कार्ड, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, नवीन पासबुक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जात प्रमाणपत्र संजय गांधी निराधार योजना इत्यादीचा गरजावंतांना लाभ देण्यात आला व उपस्थितांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोउपनि ईश्वर सुरवसे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोउपनी हरिदास जंगले यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस व एस आर पी एफ गट क्रमांक 5 दौंड चे अंमलदार यांनी मेहनत घेतली.