मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील एटापल्ली येथे आंदोलनाला 44 दिवस होऊनही कोणत्याही मागण्या पूर्ण न करता आंदोलन करण्याऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसावर कार्यवाही करणारे परीपत्रक काढल्यामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी त्या पत्राची महिला व बाल विकास कार्यालया एटापल्ली समोर होळी करुन शासनाचा जाहिर निषेध केला.
किमान 26 हजार मानधन देण्यात यावे, गैज्युट्री देण्यात यावी , पाच हजार पेन्शन देण्यात यावी या साठी महाराष्ट्रात दोन लाख अंगणवाडी महिला 4 डिसेंबर पासुन बेमुदत संपावर आहेत. या मुळे महाराष्ट्रात कुपोषण वाढत असल्याने सरकार अडचणीत आलेला आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता त्याच्यावर कार्यवाही करुन सरकार हिटलर शाहीने वागत असलेल्याचा आरोप कॉ. अमोल मारकवार यांनी केला.
जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत कोणत्याही परिस्थिती आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी ठरवुन आंदोलन पुन्हा तेज करण्याचे ठरवले. व या बाबत तहसीलदार यांना निवेदन दिले.
या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, छायाताई कागदेलवार, सुनंदाताई बावने, मायाताई नौनुरवार, विटाबाई भट, मोनी बिस्वास, वच्छला तलांडे, बबिता मडावी, कविता मुरमुरे, मंगला दुगा, राजेश्वरी खोब्रागडे, संगिता बांबोळे, तारा वैरागडे, सुमन चालुरकर, प्रेमिला झाडे यांनी केल तसेच एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील 500 महिला सहभागी झाल्या होत्या.
या आंदोलनात कॉग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आंदोलनात भाकपाचे कॉ. सचिन मोटकूलवार व कॉ. सुरज जक्कुलवार यांनी सुध्दा पाठिंबा दिला. कॉ अमोल मारकवार जिल्हा सचिव माकपा आणि अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठया संख्येने उपस्थित होते.